esakal | नांदेड : बरबड्यातील सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिस कोठडी 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बरबडा येथील खाजगी गोडाऊनमधून ४० क्विंटल सोयाबीन चोरी प्रकरणीता. १६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल होता.

नांदेड : बरबड्यातील सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिस कोठडी 

sakal_logo
By
चंद्रकांत सूर्यतळ

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील बाजार समितीत असलेल्या एका गोदामातून एक लाख ४२ हजार ८०० रुपयाचे सोयाबीन चोरल्याची घटना ता. १६ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतु कुंटुर पोलिसांनी अतिशय बारीक लक्ष ठेऊन या चोरांना पकडण्यात यश मिळवले. 

बरबडा येथील खाजगी गोडाऊनमधून ४० क्विंटल सोयाबीन चोरी प्रकरणीता. १६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यात अज्ञात आरोपी असल्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांच्या मार्गदर्शनानुसार हवालदार नागोराव पोले, पोलिस नाईक भार्गव सुवर्णकार, विजय आवुलवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयित व्यक्तींच्या हालचालीवर रात्रंदिवस लक्ष ठेवून व त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या सर्वांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. 

हेही वाचानांदेड पोलिस दलातील 34 कर्मचारी महामार्ग पोलिस दलात

यात प्रथमेश प्रभाकर पंपटवार (वय 19 वर्ष ), पवन प्रभाकर माचनवाड ( वय 19 वर्षे), ओम माधव कुराडे ( वय 24 वर्ष), तिरुपती किशन ऊलगुलवाड (वय 22 वर्षे) सर्व राहणार बरबडा तर संभाजी बालाजीराव कवळे (वय 22 वर्षे) राहणार ईळेगाव ता. उमरी यांचा समावेश आहे. तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन चारचाकी वाहनदेखील कुंटुर पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. या पाचही आरोपीस प्रथम वर्ग नायगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरिक्षक श्री. जांभुळकर करत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image