
नांदेड : उमरी स्मशानभूमी कामाची चौकशी करा
उमरी : शहरातील वैकुंठ स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली असून तेथे कसल्याच प्रकारची सुविधा नसल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांची मोठी अडचण होत आहे. तेथे पाण्याची व्यवस्था नसून रात्रीच्या वेळी अंधार आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: आमच्या सरकारमुळे गरीब लक्षाधीश ; पंतप्रधान नरेंद्र मोदी
मराठवाडा मुक्ती संग्रामात उमरी शहराचा मोठा वाटा आहे. क्रांतीवीरांचे गाव म्हणून उमरीची ओळख असून उमरी शहरातील मोंढा भागातील लोकांसाठी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. तेथे लाईटची व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले असून पाण्याची कसल्याच प्रकारची सोय नाही. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून केर-कचरा झाडे झुडपे वाढली आहेत. स्मशानभूमीच्या व्यवस्थेसाठी एका व्यक्तीची तेथे नियुक्ती करण्यात आली असली तरी त्याला नगरपालिकेकडून कसल्याच प्रकारचे मानधन मिळत नाही.
कसल्याच प्रकारचे नियोजन नसल्याने लावलेली झाडे वाळून जात आहेत. पाण्याची व्यवस्था नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. बसण्यासाठी बाक नाहीत. निवारा नाही, शेड नाही तरी देखील कुणाचेही याकडे लक्ष नाही. निवडून दिलेले नगरसेवक कोठे आहेत. नगरपालिकेचे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.
हेही वाचा: अकाेला : कर भरणार नाही; रस्ता आम्हीच दुरुस्त करतो!
या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून कोणत्या योजनेअंतर्गत स्मशानभूमीच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला किती प्रमाणात निधी खर्च करण्यात आला काम का ठप्प आहे, याबाबतीत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख तथा समन्वय समितीचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील शिंदे यांनी दिला आहे.
Web Title: Nanded Umri Cemetery Inquire About Work Warning Of Villagers To Start Agitation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..