esakal | नांदेड : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक: दोन तरुण ठार, नायगाव तालुक्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या विषयी अधिक माहिती अशी की नायगाव तालुक्यातील धनंज येथील दोन तरुण गोविंद शंकर भोसले (१९) पांडुरंग प्रकाश सुर्यवंशी (२४) हे (ता.२३)  रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान शेताकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र रात्री ११ वाजताच्या दरम्यान मुखेड रोडवरील मुगाव पाटीजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहणाने जोराची धडक दिली.

नांदेड : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक: दोन तरुण ठार, नायगाव तालुक्यातील घटना

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : घरातून शेताकडे जातो असे सांगून निघालेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला नायगाव तालुक्यातील मुगाव पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक जन जागीच ठार तर दुसरा रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू पावल्याची घटना बुधवारी (ता. २३) रोजी रात्री घडली. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की नायगाव तालुक्यातील धनंज येथील दोन तरुण गोविंद शंकर भोसले (वय १९) पांडुरंग प्रकाश सुर्यवंशी (वय २४) हे (ता. २३)  रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान शेताकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र रात्री ११ वाजताच्या दरम्यान मुखेड रोडवरील मुगाव पाटीजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. सध्या मोठ्या प्रमाणात थंडी वाढल्याने या रस्त्यावर वाहनांचीही वर्दळ कमीच होती. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी कुणी भेटले नाही. ही बातमी नायगाव पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ व हवालदार अंधारे यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण एकाचा मृत्यू झाला होता तर दुसरा नांदेड येथे उपचार चालू असताना मृत्यू पावला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पडवळ यांनी दिली आहे. 

शेताकडे जाण्यासाठी गोविंद भोसले व पांडुरंग सुर्यवंशी हे (एम.एच २६ ए.जे २८३०) या क्रमांकाच्या दुचाकीवर घरातून निघालेल्या दोघांचा अपघातात बळी गेला असून एकाचा कमरेच्या खालच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता. तर दुसऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. पण घरुन निघालेले दोन तरुण एवढ्या उशीरा मुखेडकडे कशासाठी गेले होते याचा उलगडा होत नसून हा अपघात आहे की घातपात याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image