Nanded : विष्णुपुरीतून ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded vishnupuri dam 65 thousand cusecs water

Nanded : विष्णुपुरीतून ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नांदेड : पैठण येथील जायकवाडी धरण तुडुंब भरल्याने २७ दरवाजांतून गोदापत्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणा विष्णुपुरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी (ता.१७) रात्री प्रकल्पाचे पाच तर रविवारी (ता.१८) दोन दरवाजे उघडण्यात आले. सध्या सात दरवाजांतून ६५ हजार ५०७ क्युसेस वेगाने गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे उष्णतेत वाढ होवून नागरिक घामाघुम होत असताना, पुन्हा एकदा पावसाने जोर धरला. शहरातील अनेक सखल भगात पाणी साचले होते. तर सलग दुसऱ्या दिवशीही शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जुलै आणि आॅगस्टमध्ये अतिवृष्टीसदृश्य पावसाने हाहाकार केला होता. दोन वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

जायकवाडीचे २७ दरवाजे उघडले

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैठणचे जायकवाडी धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे धरणाचे २७ दरवाजे उघडून गोदवरीच्या पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे लाभक्षेत्राच्या वरच्या भागातून पाण्याची आवक वाढत आहे. यात जिल्ह्यात दोन दिवसांपासून झलेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत.

चार जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरण काठोकाठ भरले आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासह जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी धरणात आवक सुरु झाली आहे. या मुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजांसह र्व २७ दरवाजे चार फुटाने उचलून एक लाख १३ हजार १८४ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला आहे. ही आवक लक्षा घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते अशी शक्यता लक्षात घेता औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी प्रासनाच्या वतीने सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान मागच्‍या काही दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, पिण्याचा पाण्याच्या समस्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. शेतकऱ्यांना यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा फटका बसला असला तरी येणारा रब्बी हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Nanded Vishnupuri Dam 65 Thousand Cusecs Water Seven Gates Opened

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..