नांदेड : ५६ जणांचे ६६ आक्षेप, हरकती दाखल

नांदेड - वाघाळा महापालिका; निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा
Nanded Waghala Municipal Corporation election
Nanded Waghala Municipal Corporation electionsakal

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिका निवडणुक २०२२ च्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्यावर शुक्रवारी (ता. २४) शेवटच्या दिवशी ३८ आक्षेप व हरकती दाखल झाल्या आहेत. एकूण ५६ जणांचे ६६ आक्षेप व हरकती दाखल झाल्या आहेत. आता यावर येत्या ता. चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे.

नांदेड वाघाळा महापालिकेची येत्या ता. ३० आक्टोंबर रोजी मुदत संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा ता. १३ जून रोजी प्रसिद्ध केला होता. सध्या महापालिकेत २० प्रभागातून ८१ सदस्य निवडून आले आहेत. आक्टोंबर २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ३१ प्रभागातून ९२ सदस्य निवडून जाणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला होता. राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या या प्रभाग रचनेवर ता. २४ जूनपर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या.

शुक्रवारी शेवटच्या दिवशी ३८ आक्षेप व हरकती दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५६ जणांनी ६६ आक्षेप व हरकती दाखल केल्या आहेत. गाडीपुरा, गवळीपुरा - नगीनाघाट, गुरूद्वारा आदी प्रभागामध्ये सर्वाधिक अर्ज आले आहेत. या आक्षेपामध्ये काही भाग वगळणे तर काही नवे भाग जोडण्यात यावेत, यासाठी मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, सहायक आयुक्त सुधीर इंगोले, वरिष्ठ लिपिक अख्तर इनामदार, मोहमंद युनुस, श्री. जोशी आदी पाहत आहेत.

चार जुलैला होणार सुनावणी

राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर जे आक्षेप, हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यावर येत्या ता. चार जुलै रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून पुणे येथील समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य निवडणुक विभागाचे उपायुक्त अविनाश सणस, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com