नांदेड : गोळेगावात दहा वर्षानंतर ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा

ग्रामस्थाना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तर सधन नागरिक मासिक पैसे देऊन बोअरवेल धारकाकडून पाणी विकत घेत होते.
गोळेगाव ता. लोहा पाणीपुरवठा सुरु
गोळेगाव ता. लोहा पाणीपुरवठा सुरु

मारतळा ( जिल्हा नांदेड ) : गोळेगाव तपोवन ( ता. लोहा ) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना गेली दहा वर्षापासून बंद अवस्थेत होती. त्यामुळे गावकऱ्यांना दुरवरुन पाणी आणावे लागत होते. अखेर हा पाणी प्रश्न सुटला आहे. तब्बल दहा वर्षानी पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

त्यामुळे ग्रामस्थाना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तर सधन नागरिक मासिक पैसे देऊन बोअरवेल धारकाकडून पाणी विकत घेत होते. मात्र मागील ग्रामपंचायतीचे नाकर्तेपणामुळे शासनाने पाणीपुरवठा योजनेवर केलेला लाखोचा खर्च करुनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे याबाबतीत ग्रामस्थातुन अनेकवेळा मागणी करुनही पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. मागील सहा महिण्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी गटाचा पराभव झाला व नवीन कारभारी गावकऱ्यांनी निवडले. त्यामुळे निवडणुक जाहीरनाम्यामध्ये जाहीर केल्याप्रमाणे पँनेलने पाणीपुरवठ्यासह गावासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पुरवण्यात येथील असे जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा - एकंदरीत या तक्रार अर्जित निवेदनामध्ये केलेल्या मागण्यांवर मुख्यमंत्री नेमकं काय तोडगा काढतात, याकडे सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे लक्ष लागले आहे

नवनिर्वाचीत सरपंच पार्वतीबाई गायकवाड व उपसरपंच कलावतीबाई ढाले, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर कपाळे, गंगाबाई ढाले, रामचंद्र मुरुड, आशाताई शिराळे, विद्याताई ढाले, राधाबाई कोल्हे, मिनाबाई तारु यांनी व ग्रामसेवक यांनी गावातील सर्व समस्यांची माहिती घेऊन प्रथम गावातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा प्रश्न नालेसफाईकडे लक्ष देत, संपूर्ण नाल्यांची सफाई करुन गाव स्वच्छ व सुंदर केले. विजेसंबधी असणाऱ्या सर्व समस्यांचा निपटारा करण्यात आला. गावातील सर्व ठिकाणी विद्युत बल्प लावुन गाव प्रकाशमय केले. त्यानंतर गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे गेली दहा वर्षापासून बंद असलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन, गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरु केला. पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यात आला.

येथे क्लिक करा - या मोहीमेला अर्धापूर तालुक्यात खुप मोठा प्रतिसाद मिळाला असून पंतप्रधान मोदींना पत्र पाठविण्यात येत आहेत

गेली दहा वर्षापासून बंद पडलेल्या योजनेसाठी जिल्हा परिषदकडून गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन, दोन विहिरी व पाईप लाईन, पाण्याची टाकी एवढा मोठा खर्च करुन केवळ, नियोजनाअभावी पाणीपुरवठा योजना याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. त्यामुळे बंद असलेला पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी नवीन पाईपलाउन व आवश्यकता असणाऱ्या सर्व साहित्याचा पुरवठा करुन गावात सार्वजनिक विहिरीचे पाणी आणले व नळाद्वारे ग्रामपंचायतकडून प्रत्येक घरी नळजोडणी देण्याचे काम करत पाणीपुरवठा पुर्ववत चालू केल्यामुळे गावातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला. पाण्यासाठी जाणारा बिनकामाचा वेळ आणि पैशाची बचत झाली. मात्र पुर्वीचे सरपंच व ग्रामपंचायतीचे नियोजनाअभावी शासकीय पाणी मिळत नसल्यामुळे खासगी बोअरधारकाकडुन पाणी विकत घेऊन वापरावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थातुन समाधान व्यक्त केल्या जात आहे. तर याकामी परिश्रम घेणारे उपसरपंच प्रतिनिधी कैलास पाटील ढाले व सर्व सदस्य यांनी अखेर दहा वर्षानंतर गावात पाणी पुरवठा पुर्ववत सुरु केल्याबद्दल अभिनंदन होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com