

Nanded faces a water supply challenge as the civic body plans to preserve Vishnupuri Reservoir storage through next August.
esakal
नांदेड, : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्यापुढे आगामी उन्हाळ्यात मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. शहराला रोज १२० ते १३० एमएलडी (१२ ते १३ कोटी लिटर) पाण्याची गरज असताना विष्णुपुरी जलाशयातील उपलब्ध साठा पुढील ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यातच जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी २.५९ मीटरची घट झाली असून, १३२ निरीक्षण विहिरींपैकी १२८ विहिरींच्या पाणीपातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे पाणीबचतीचा संदेश आता केवळ आवाहन न राहता शहरासाठी गरज बनली आहे.