बापरे नांदेडला घरात निघाला नऊ लाखाचा औषधी साठा; अन्न व औषध प्रशासनाकडून औषधी जप्त  

शिवचरण वावळे
Monday, 24 August 2020

कोरोना संसर्ग पसरत असल्याने मागील सहा महिण्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा सुविधा वगळगता इतर कुठलेही दुकान किंवा प्रतिष्ठाने, उद्योग सुरु नव्हते. बंद दरम्यान गोळ्या औषधी असोत किंवा शेती संबंधी बियाणे किंवा औषधी, खते यांचा तुटवडा जाणवू नये म्हणून साठे बद्दरावर शासन बारकाईने लक्ष ठेवून होते. तरी देखील काही साठे बाहद्दरांनी साठे बाजिचा नाद सोडला नव्हता. नांदेड शहरात देखील मेडीकल कंपनीच्या एका एमआरने घरात ताप, सर्दी, खोकल्याची नऊ लाखाचा औषधी साठी घरात दडवून ठेवला होता.   

नांदेड : शहरातील एका औषध कंपनीचा औषध प्रतिनिधी याने त्याच्या राहत्या घरी प्रेमनगर अपार्टमेंटमध्ये विना परवाना गोळ्या व औषधांची साठवणूक केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाल्याने सोमवारी (ता.२४) अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रेमनगर येथे धाड टाकुन नऊ लाखाच्या गोळ्या व औषधींचा साठ जप्त केला आहे. 

लॉकडाऊन काळात कुठल्याही औषधींचा साठा करण्यावर शासनाने बंदी घातली असताना देखील प्रेमनगर सोसायटीतील औषध कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात औषध गोळ्या आल्या कुठून असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात औषधींचा साठा करण्यासाठी परवाण्याची गरज असते परंतू संबंधीत व्यक्तीकडे औषधी साठा करण्यासाठीचा कुठलाही परवाना नसल्याचा निर्वाळा अन्न औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 हेही वाचा- पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या गडाला धक्का, मुदखेड पंचायत समितीचे सभापती वंचितच्या गळाला​

प्रशासनाकडे लेखी तक्रार

या विषयी माहिती अधिकार संरक्षणचे प्रदेशाध्यक्ष पवन बोरा यांनी अन्न औषध प्रशासन विभागाकडे या विषयी लेखी तक्रार दिल्याने अन्न व  औषध प्रशासनाने ही धाडसी कारवाई करुन मेडीकल कंपनीच्या एमआरच्या प्रेमनगरातील घरावर धाड टाकुन ही कारवाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा- दूर्दैवी घटना: महिला पोलिस रस्ता अपघातात ठार ​

औषध - गोळ्यांचे नमुने प्रशासनाच्या ताब्यात 

अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत आढळुन आलेले गोळ्या औषधांचा स्टॉक घरातच ठेवून त्यावर विशेष मार्किंग करण्यात आली असून, पुराव्यासाठी काही म्हणून औषध व गोळ्यांचे नमुने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असल्याचे औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहीत राठोड यांनी माहिती दिली. 

प्रशासनाकडे तक्रार केल्याने हे प्रकरण उजेडात

काही दिवसापूर्वी मी प्रेमनगरातील एका मित्राकडे गेलो असता त्या ठिकाणी बाहेर वऱ्हाड्यात काही पॅकींग वस्तूची बॉक्स नजरेस पडली होती. त्या बद्दल अधिक माहिती घेतली असता त्यात ताप, सर्दी व खोकल्याची औषधी असल्याचे समले. त्यानंतर उघड्यावर स्टॉक केलेल्या  औषधी विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्याने हे प्रकरण उजेडात आले
- पवन बोरा - प्रदेशाध्यक्ष माहिती अधिकार संरक्षण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded went home with a stock of nine lakh medicines; Drugs confiscated from the Food and Drug Administration Nanded News