esakal | नांदेड : योगशिक्षक नीळकंठ मोरे यांचा कोरोना काळात नवा उपक्रम

बोलून बातमी शोधा

निळकंठ मोरे योगशिक्षक
नांदेड : योगशिक्षक नीळकंठ मोरे यांचा कोरोना काळात नवा उपक्रम
sakal_logo
By
धोंडिबा बोरगावे

नांदेड : कोव्हीड- १९ चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून कंधार पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी तथा मूळचे पानशेवडी येथील रहिवासी पण सध्या कंधार येथे वास्तव्यास असलेले योगशिक्षक नीळकंठ मोरे यांनी या कोरोना काळात दररोज सकाळी साडेपाच वाजता गूगल मिटद्वारे ऑनलाईन योगशिबीराचे आयोजन केले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन नीळकंठ मोरे यांनी केले. कंधार परिसरासह नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून व महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून जवळजवळ ८० योगसाधक व त्यांच्या घरातील जवळपास ३०० जण या योगवर्गासी जुळलेले आहेत. याचा अनेकांना कोरोना महामारीत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नक्कीच लाभ होत आहे.

पानशेवडी येथील संत नामदेव महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्वदूर परिचित झालेले योगशिक्षक नीळकंठ मोरे हे दोन वर्षापुर्वी पानशेवडी येथे योगशिबीर घेण्यासाठी भल्यापहाटे जात असताना. रस्त्यात त्यांचा अपघात झाला होता. डाव्या पायाचे तीन आॕपरेशन झाले परंतु अशा संकटाला न डगमगता या योग साधनेच्या जोरावर ते आज बरे होवून योगाचे शिबीर घेत आहेत.

दरम्यान अपघात झाल्यानंतर अनेक अडचणी त्यांच्या समोर आल्या तेव्हा छायाताई मोरे यांची पत्नी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहून सुखात व दुःखात बरोबरीने साथ असल्याचे सिद्ध केले. एकीकडे पगार नाही, पैसा नाही अशावेळी पतंजली धावून येईल म्हणून आम्ही निवेदन दिली अनेक पेपरमधून नीळकंठ मोरेबाबत लेखन केले, परंतु आमचा आवाज स्वामी रामदेवजी बाबांच्या कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने त्यांच्यापर्यंत पोहचवला नाही अथवा स्वामी रामदेव बाबापर्यत गेलाच नाही..

हेही वाचा - अत्यंत मनमिळावू म्हणून ओळखले जाणारे परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे शनिवारी (ता. २४) एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता कोरोनाने निधन झाले.

ब-याच वेळी आम्ही पतंजलीवर नाराजी व्यक्त केली. तेव्हा नीळकंठ मोरे आणि मी जे कार्य करत आहे ते मला मदत व्हावी म्हणून नाही. पतजंली योग समितीला काही म्हणू नका अशी विनंती अशाही संकट काळात त्यांनीच केली. नांदेड जिल्ह्यातील पतंजली परिवारानी संकट काळात बरीच साथ दिली.

अशा अनेक अडचणीतून व एवढ्या मोठ्या संकटातुन नीळकंठ मोरे आज बरे झाले आहेत यांचे सर्व श्रेय स्वामी रामदेवजी बाबा यांच्या योगसाधनेला देवुन पुन्हा नव्याने कोव्हीडा- १९ या महामारीत आपले जिवाभावाचे मित्र गमवावे लागले यांची खंत तर सर्वांच्या मनात आहे. परंतु खंत करत बसण्यापेक्षा आहेत ते हि-यासारखे सोबती मित्र, नातेवाईक, मार्गदर्शक कोरोनाचे बळी होऊ नये म्हणून उदात्त भावनेने पुन्हा डॉक्टर, शिक्षक आणि सर्वांत महत्त्वाचे सर्वसामान्य योगसाधक यांच्यासाठी नीळकंठ मोरे यांनी ऑनलाईन गुगल मिटवर योगाचे शिबीर आयोजित करुन त्यांना स्वामी रामदेवजी महाराज यांच्या योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्याचे विचार घराघरात पोहचवण्यासाठी या कोव्हीड काळात न डगमगता, न घाबरता दररोज योगसाधना करावी यासाठी योगसंदेश निवास शिवाजीनगर कंधार येथून सदरील वर्ग सुरु केले आहे.

ता. तीन एप्रिलपासून शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह खेड्यात राहणारे शेतकरीबंधू, व्यापारी, विविध क्षेत्रातील साधकासाठी गूगल मीटवर योग शिबीर दररोज सकाळी ठिक साडेपाच वाजता निःशुल्क सुरु झालेले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन केलेले आहे. सध्याच्या घडीला कोरोनापासून बचाव करायचा असल्यास घरी राहण्याशिवाय उत्तम पर्याय नाही. कोरोनामुळे २४ तास घरात बसलेल्या लोकांचा कोरोनापासून बचाव होत असला तरी आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाही. परिणामी हालचाल होत नाही. पोटाच्या समस्यांमध्ये गॕस, बद्धकोष्टता, मलावरोध, पोट साफ न होण्याची समस्या सर्वसामान्य झालेली आहे. कारण ऊर्जेचा पुरेपुर वापर केला जात नाही. खालेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन न झाल्यामूळे ही समस्या उद्भवत आहे. म्हणून यापुर्वी योग करण्यासाठी वेळ नाही म्हणणार्यांसाठी सध्या भरपूर वेळ मिळाला आहे. योगप्रेमी साधकासह सर्वसामान्य नागरिकांनी कोव्हीड -19 ची लस न चुकता घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. व आपल्या परिवारासाठी निरोगी निरामय आरोग्यासाठी लस घेऊन सातत्याने योगसाधन करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढवून. कोरोना काळात सुरक्षित रहावे, या योगवर्गात सुक्ष्म व्यायाम, विविध योगासने, प्राणायाम व ध्यान इत्यादी घेतले जात आहे.

हा गुगल मिट लाईव्ह योगवर्ग सातत्याने चालणार आहे. या योगवर्गाचा जास्तीतजास्त लोकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन पतंजली योग समिती कंधार तालुका प्रभारी नीळकंठ मोरे यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे