नांदेड जिल्हा परिषद इमारतींना गळती : दुरुस्ती निधी गेला कुठे?

वानोळा गटातील आरोग्य उपकेंद्र; शाळा दुरुस्ती निधी गेला कुठे?
Nanded Zilla Parishad buildings roof Leakage
Nanded Zilla Parishad buildings roof Leakage

माहूर - दुर्गम डोंगराळ भागातील तत्कालीन वानोळा व सध्याच्या लखमापूर जिल्हा परिषद गट अंतर्गत समाविष्ट गावांमधील जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा व अंगणवाडी इमारतींची अवस्था दुरुस्ती अभावी अत्यंत दयनीय झाली असून शाळेच्या वर्गखोल्यांचे छताचा सिमेंटचा स्तर गळून पडल्याने लोखंडी गज दिसू लागले आहेत. शिवाय संपूर्ण इमारतीमध्ये पाण्याची गळती सुरू असल्याने ग्रामीण खेड्या गावातील आरोग्य व शिक्षण व्यवस्था जीवघेणी बनली आहे.

मागील पंधरवड्यात संततधार अतिवृष्टीमुळे माहूर तालुक्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते, तर मागील तीन दिवसांपासून पुन्हा मौसमी पावसाने झड लावली आहे. अशात सर्वसामान्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पावसाची रिपरिप सातत्याने सुरूच असल्यामुळे वातावरणामध्ये देखील बदल होऊन सर्दी, ताप, खोकला आदी आजारांची समस्या जाणवत आहेत. अशात तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्हा परिषद इमारतींच्या बकाल अवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे.

वर्षानुवर्षे दुरुस्तीअभावी खितपत पडलेल्या जीर्ण अवस्थेतील शाळा इमारती मध्ये ज्ञानार्जन करताना विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. अनमाळ येथील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्र व शाळेच्या इमारतीची मागील अनेक वर्षापासुन दुरावस्था झाली असून पावसाळ्यात छताचे धपले पडत आहेत. त्यामुळे वर्ग खोल्यात व व्हराड्यांत पाणी साचत आहे. कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील शैक्षणिक साहित्य भिजले जाऊ शकते. तसेच शिक्षण घेण्यास व शिक्षण देण्यास मुलांसह शिक्षकांना अडचणीस

सामोरे जावे लागत आहे. तर आरोग्य उपकेंद्राच्या स्लॅबला पाझर फुटल्याने रुग्णांनी उपचार घ्यावा कसं व आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार करावं कसं असे एक ना अनेक प्रश्न या खेड्या गावातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सोयी सुविधा संदर्भात माहूर तालुक्यातील जागरूक व्यक्तिमत्त्व डॉ. निरंजन केशवे यांनी पाहणी केल्यानंतर निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळाली.

आज अतिवृष्टीमुळे अनमाळ येथील उपकेंद्र व जिल्हा परिषद शाळेला गळती लागली, त्यामुळे तेथील रुग्णांना व विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. त्या ठिकाणी पाहणी केल्या नंतर विद्यार्थी आणि शिक्षक आपला जो मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवित आहे. जिल्हा परिषदेने या इमारतींचे तात्पुरत्या स्वरूपाचे दुरुस्ती काम शक्य तितक्या लवकर हाती घेणे गरजेचे आहे.

- डॉ. निरंजन केशवे, माहूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com