Nanded : जिल्हा परिषदेचे विद्यार्थी करणार ‘इस्रो’ची वारी !

विष्णुपुरी येथील विद्यार्थिनी उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सज्ज
विद्यार्थी
विद्यार्थी sakal

नवीन नांदेड : मागील काही वर्षापासून इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकणे आणि टिकवणे अवघड होत गेले. अनेक मराठी शाळा बंदही पडल्याचे चित्र निर्माण झाले असताना मागील काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. म्हणूनच आपल्या नाविन्यपूर्ण ज्ञानातून विष्णुपुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी येथील आठवीच्या विद्यार्थिनींना उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सज्ज केले आहे.

भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ करण्याचा पाया रोवणे, अंतराळ संशोधनावर जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, शास्त्रज्ञाच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी,

राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी त्यांना विमान प्रवासासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करणाऱ्या भारतातील ‘इस्रो’ आणि अमेरिकेतील नासा संस्थेला संस्थेला गुणवंत विद्यार्थ्यांची भेट घडविण्याची योजना आयुक्त कार्यालय औरंगाबाद व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आखली आहे.

विद्यार्थी
Nanded : पोलिस जमादाराला लाच घेताना अटक

जिल्हा परिषदेच्या शाळामधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची आंतरीक्ष केंद्र श्रीहरीकोटा, थुंबा येथील स्पेस म्युझियम, वीरेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शाळास्तर, केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तरातून चाळणी परीक्षेतून निवडून येणाऱ्या गुणवंत मुलांची शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या विष्णुपुरी येथील शाळेत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त व डिजिटल पद्धतीने शिकविले जात आहे. या नवनवीन उपक्रमांमुळे ‘झेडपी’च्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नाव कमविले आहे. या शाळेतून गुणानुक्रमे दहा मुलांची निवड होऊन धनगरवाडी केंद्र स्तर गुणवत्ता यादी साठी पात्र झाली.

तदनंतर प्रस्तुत प्रशालेचे दहा मुले केंद्रांतर्गत गुणवत्तेत येऊन नांदेड तालुका अंतर्गत गुणवत्तेसाठी पात्र पैकी सदरील शाळेच्या चार मुलींची निवड ही नांदेड जिल्हा गुणवत्ता पात्रतेसाठी झाली. तर अंतिम १६७ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यां मधून ५० गुणवंत विद्यार्थी हे सहलीसाठी पात्र ठरले आहेत.

या अंतिम यादीत जिल्हा परिषद विष्णुपुरीच्या आठव्या वर्गातील आश्लेषा दत्ता केंद्रे व सृष्टी शरद सोनटक्के या विद्यार्थिनी पात्र ठरल्या. निवडीची माहिती मिळताच आमदार मोहन हंबर्डे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास देशमुख हंबर्डे, साहेबराव हंबर्डे, शंकरराव हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे, राजेश हंबर्डे,

गोविंदराव हंबर्डे, ॲड. जयसिंग हंबर्डे, शिवाजी चांदणे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले. मुलांना मुख्याध्यापक नागनाथ दिग्रसकर, पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक, विज्ञान शिक्षक उदय हंबर्डे, आनंद वळगे, गणित शिक्षक कृष्णा बिरादार, विकास दिग्रसकर, जयश्री शिंदे, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेश कुलकर्णी, सोमनाथ बिदरकर, खदीर, काकडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

शालेय व्यवस्थापन समितीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, शाळेतील सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने नेहमीच आमची शाळा विविध शासकीय, निमशासकीय उपक्रमात यश खेचून आणते. प्रशालेतील सकारात्मक विचारसरणीमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

— विलास हंबर्डे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती.

संस्कार, गुणवत्ता व प्रगती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विष्णुपूरी प्रशाला ही गुणवत्तापूर्ण शाळा असून आमचे विद्यार्थी नेहमीच विविध स्पर्धात्मक परीक्षेसह इतरही परीक्षेत सर्वोच्च यश मिळवतात.

— राजेश कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com