नांदेड : शिक्षकांच्या बदल्यांना लवकरच मुहूर्त

जिल्हा परिषद; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आज ऑनलाइन प्रशिक्षण
Nanded Zilla Parishad Teacher transfers soon
Nanded Zilla Parishad Teacher transfers soonsakal
Updated on

नांदेड : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांना लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता असून यासाठी आॅनलाइन प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीच्या अनुषंगाने आज बुधवारी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आॅनलाईन प्रशिक्षण होणार आहे.

मागच्या महिन्यात जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक म्हणून वर्षा ठाकूर-घुगे यांच्या निगराणीत ही प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली. यानंतर आता जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या कधी होतील, याकडे लक्ष लागले होते. या बदल्यांच्या हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदल्यांसाठी ता. सात एप्रिल २०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील आवश्यक त्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. त्या धोरणातील अनुषंगाने जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी आॅनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली असून, २०२२ मधील बदल्या आॅनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.

सदर प्रणालीमध्ये प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाच्या अनुषंगाने आज सकाळी अकरा ते एक या वेळेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आॅनलाइन प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही उपस्थित राहण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव दळवी यांनी मंगळवारी (ता. सात) दिल्या आहेत. शासनाच्या या निर्देशामुळे शिक्षकांच्या बदल्यांना लवकरच मुहूर्त लागेल असे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nanded News
Nanded News
Nanded News
Nanded News
Marathi News Esakal
www.esakal.com