esakal | नांदेडची शतकाकडे वाटचाल : आज पुन्हा १३ पॉझिटिव्ह  
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

एकीकडे तांत्रिक अडचणीमुळे ‘स्वॅब’ तपासणी अहवालास उशीर होत असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे लॅब टेक्नीशियन मात्र लॅबमध्ये तांत्रिक अडचण असल्याच्या दावा फोल असल्याचे सांगतात. त्यामुळे जिल्ह्यात नेमके काय सुरु आहे? या बद्दल नांदेडकरांच्या मनात शंका कुशंका उपस्थित होत आहे. त्यामुळे नांदेडकरांची चिंता चांगलीच वाढली आहे. 

नांदेडची शतकाकडे वाटचाल : आज पुन्हा १३ पॉझिटिव्ह  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यामध्ये रविवारी (ता. १७ मे) पुन्हा १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९७ वर गेली असून, ६४ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी २६ जण घरी गेले असून, पाच जणांचा मृत्यू तर दोन फरार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

शनिवारी प्रलंबित असलेल्या ३८० स्वॅब अहवालांपैकी रविवारी (ता.१७ मे) सकाळी ३७४ स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत.  त्यापैकी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ वर पोहचली आहे.  रविवारी १३ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १३ ते ७४ वयोगटातील १२ पुरुष आणि ५७ वर्षीय एका महिलेचा समावेश आहे. या रुग्णांवर यात्रीनिवास व एनआरआय भवन आणि ग्रामीण रुग्णालय बारड येथे उपचार सुरु असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे.   

हेही वाचा - अनेक अहवाल प्रलंबित, लॅबमधील तांत्रिक अडचणीचे गौडबंगाल काय...?

सद्यस्थितीमिध्ये जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ वर पोहचल्याने नांदेड आता शतकाकडे वाटचाल करत असल्याचे स्पस्ट झाले आहे. शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या १८ पॉझिटिव्ह अहवालात १३ परराज्यातील प्रवासी, चार रुग्ण करबला भागातील तर सराफा कुंभारगल्ली येथील एक रहिवासी अशा १८ जणांचा समावेश होता. रविवारी आलेल्या १३ पॉझिटिव्ह अहवालात नऊ कोरोना बाधीत रुग्ण हे परराज्यातील प्रवाशी असून, एक रुग्ण करबला भागातील, दोन रुग्ण अबचलनगर भागातील तर एक रुग्ण बारड (ग्रामीण) येथील रहिवाशी असल्याचे डॉ. भोसीकर यांनी कळवले आहे.
 
नांदेड जिल्ह्याची सद्यस्थिती 

  • एकुण पॉझिटिव्ह - ९७
  • आतापर्यंत कोरोनामुक्त - २६
  • मृत्यू - पाच
  • दोघे जण फरार
  • उपचार सुरु - ६४
loading image
go to top