

Nandigram Express
esakal
गोकुंदा (जि. नांदेड) : बल्लारशाहहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्स्प्रेस मंगळवारी (ता. १५) किनवट रेल्वे स्थानकातून रवाना झाल्यानंतर अपेक्षित रुळाऐवजी दुसऱ्याच रुळावर गेल्याचा प्रकार घडला. पुढे रुळाची जोडणी नसल्याचे लोको पायलटच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने ब्रेक लावून गाडी थांबवली. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला.