राष्ट्रीय महामार्गाचा वाद : लोह्यात संतप्त शेतकरी रस्त्यावर, काम बंद पाडले

राष्ट्रीय महामार्ग 361 लोहा वळण रस्ता शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष माणिकराव मुकदम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. वाढीव मावेजा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत वळण रस्त्याचे काम सुरु होऊ देणार नाही
लोहा महामार्ग काम बंद पाडले
लोहा महामार्ग काम बंद पाडले

लोहा ( जिल्हा नांदेड ) : लोहा शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वळण (Loha highway) रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मंजूर झालेला वाढीव गुणांक अद्यापही मिळालेला नाही. तर दुसरीकडे उपविभागीय अधिकारी (dy collector) यांच्या " अर्थ'' पूर्ण कारभारामुळे हे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधी वाढीव गुणांकनुसार मावेजा घ्या मग काम करा असे निक्षूण बजावत शेतकऱ्यांनी वळण रस्त्याचे काम बंद पाडले. (National- Highway- Dispute-Farmers- angry- over- iron- on the- road- work -stopped)

राष्ट्रीय महामार्ग 361 लोहा वळण रस्ता शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष माणिकराव मुकदम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. वाढीव मावेजा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत वळण रस्त्याचे काम सुरु होऊ देणार नाही. असा निर्धार या वळण रस्त्यात जमिनी जाणाऱ्या ३०६ भूधारकांनी केला. प्रत्यक्षात सदरील वळण रस्त्यात संपादित होत असलेल्या सर्व जमिनीचा सुधारित गुणांकनुसार मावेजा बाधित शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तसेच पुरवणी जाहीर प्रगटन काढून संपादित होत असलेल्या जमिनीचा मावेजा सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. कंधारचे उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्याकडे चौकशी केली असता प्रस्तावित असल्याचे सांगून शेतकऱ्यांची हेटाळणी करतात. त्यांच्या ऑफिसमधील कोणतेही काम- दाम दिल्याशिवाय होत नाही असा उघडउघड आरोप संतप्त भूधारकांनी केला.

हेही वाचा - भोकरमध्ये राणी भोंडवेंची धडाकेबाज कारवाई; अवैध गुटखा जप्त

वाढीव मावेजा आठ दिवसात मिळणार असे या भागातील आमदारांनी बातम्या देऊन जाहीर केले, पण दुसरा सप्टेंबर येतोय तरीसुद्धा वाढीव गुणांक नुसार आम्हा शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही असा रोष व्यक्त केला. शनिवारी सकाळीच वळण रस्ता बाधित शेतकरी बेरळी फाटा येथे कामावर गेले त्यांनी एरिया मॅनेजर यांना भूधारक शेतमालकांचे काय मागणी आहे ? कशासाठी संघर्ष सुरु आहे. हे उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी अवगत केले आणि काम बंद पडले. यावेळी नगरसेवक संभाजी चव्हाण, अॅड. कोटलवार राजेश मुकदम, सचिन मुकदम, सुधाकर पवार गोपीनाथ पवार, नारायण पाटील, श्री. चव्हाण, दशरथ पवार, गजानन चव्हाण, वैजनाथ पवार, श्रीराम चव्हाण, नागनाथ चव्हाण यासह शेतकरी उपस्थित होते. शिष्टमंडळाने वळण रस्त्यात संपादित होत असलेल्या जमिनीचा सुधारित मावेजा मिळाल्यानंतरच सदरील रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी संबंधितांना आदेशित असे निवेदन खासदार चिखलीकर यांना देण्यात आले.

शेतकरी शिष्टमंडळाने खा. चिखलीकर यांची भेट घेतली सविस्तर माहिती दिली. प्रतापरावांनी वाढीव गुणांकसाठी केलेले प्रयत्न याची आठवण सांगितली. सर्वांच्या समोर ते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन बोलले. लवकरच या वळण रस्ता बाधित झालेल्या व योग्य मावेजा न मिळालेल्या जमीनधारकांची व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठक होईल त्यात हा मार्ग निकाली निघणार असे या शिष्टमंडळास खा. प्रतापराव पाटील यांनी आश्वासित केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com