ममतेत तुझ्या आई कशी ही खोट...पिल्यास देई दाणा चिऊचे बंद ओठ..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nature too animals birds and beasts is equally important

ममतेत तुझ्या आई कशी ही खोट...पिल्यास देई दाणा चिऊचे बंद ओठ..!

भोकर : मायेच्या गर्भातच बाळावर सुसंस्काराचे बीजारोपण केल जाते. जन्मानंतर त्याच बिजाकुंरातून नव्या पालवीला धूमारे फूटतात. ‌मायेच्या शितल वृक्षाच्या छायेत जिवनाचा नूरच पालटुन जातो. स्वताह ऊपासपोटी राहून चिल्यापिल्यांना घास भरवीते. पिल्याच्या पंखात हत्तीच बळ येतं म्हणूनच कवी मन बोलून लागत. ममतेच तुझ्या या माय कशी हि खोट. चिमण्यास देई दाणा चिऊचे बंद ओठ..!

माय या शब्दात आगळी वेगळी ममता दडलेली आहे. ती ममता जेव्हा प्रगट होते तेंव्हा निर्जीव दगडाला ही पाझर फूटतो. ममतेच्या अंथाग सागराची खोली अद्याप सापडली नाही. घरसंसारातही तिचा सिंहांचा वाटा असतो. मायन गर्भातच इवल्याशा जीवावर जीव ओतला आणि सुसंस्काराचे बीजारोपण केले. तीच ‘कमाई’ पाठीवर घेऊन आपण जगतो आहोत. प्रेमळ, वात्सल्य सिंधू, कणवाळू, ममत्वानी ओतप्रोत भरलेली, दयेचा सागर अशा कीतीतरी उपाधी लावल्या तरही कमीच पडत.

निसर्गातही पशुपक्षी, प्राणी, जनावरात ‘माय’च स्थान तितकंच मोलाचं आहे. आल्हाददायक व प्रसन्न असलेल्या निसर्गाच्या कुशीत अनेक जीवजंतू आहेत. त्याची दिनचर्या मानवाच्या जीवनाशी मिळतीजुळती असते. पूर्वी पहाटेच्या वेळी पक्षाचा किलबिलाट ऐकायला मिळत असे पण विज्ञान युगात तो किलबीलाट नाहिसा झाला आहे. जीथे मूबलक पाणी, हिरवाई नटलेली आहे तीथे पक्षांचा वावर दिसतो आहे. अशाच एका इवल्याशा पक्षांनी आपल्या पिलासाठी मोठ्या कष्टाने घरटं (खोपा) उभारला आहे. ईवलाशा पक्षाची ती खटाटोप मोबाईल कॅमेरात कैद केली आहे. काडीकाडी जमवून घरटं उभारल. पिलांना नर आणि मादी पक्षांनी घास भरवल्याने पील्याच्यां पंखात हत्तीच बळ आलं. एके दिवशी पीलांनी आकाशात भरारी घेतली आणि घरटं आता सूनसून झाले आहे. पिलांना फुटता पंख घेती झेप आकाशी. गेली ऊडोणी पील्ले घरटे झूले फांदिशी..!

Web Title: Nature Too Animals Birds And Beasts Is Equally Important

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nanded
go to top