
नायगाव : जूनचा अर्धा महिना संपून गेला तरी दमदार पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे नायगाव तालुक्यात ३५ ते ४० टक्केच पेरण्या झाल्या असून, काही ठिकाणी धूळपेरणी करून पावसासाठी आकाशाकडे शेतकरी नजरा लावून बसले आहेत. शेती निसर्गाच्या लहरी पावसावर अवलंबून असल्याने पेरलेले उगवेल की नाही आणि पिकले तर घरात येईल याचाही भरवसा नाही.