esakal | राष्ट्रवादी काॅंग्रेस : ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्हामध्ये आशादायी चित्र आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, पक्षासाठी वेळ देणारा, प्रत्येक निवडणुक ही अस्त्विाची निवडणुक आहे, हे समजून पुढे जाणारा व राजकीय क्षमता असलेल्या सर्वसमावेशक अशा निष्ठावान व्यक्तीमत्वाला जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पक्षनिरीक्षक अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस : ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मागील तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकरीता प्रत्येक तालुकानिहाय कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी लेखी स्वरूपात आपले म्हणणे मांडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असून त्यामध्ये प्रमुख आठ जण इच्छुक आहेत. या आठ इच्छुकांचा अहवाल पक्षश्रेष्ठींपुढे मांडणार आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठी यावर अंतिम निर्णय घेतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्हामध्ये आशादायी चित्र आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, पक्षासाठी वेळ देणारा, प्रत्येक निवडणुक ही अस्त्विाची निवडणुक आहे, हे समजून पुढे जाणारा व राजकीय क्षमता असलेल्या सर्वसमावेशक अशा निष्ठावान व्यक्तीमत्वाला जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पक्षनिरीक्षक अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग याठिकाणी आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकरीता नांदेड जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक अविनाश आदिक आणि रविंद्र तौर यांनी दि. 20, 21 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हयामध्ये तालुकास्तरावर जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची म्हणणे ऐकून घेतले. तर दि. 22 ऑक्टोबर रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची म्हणणे ऐकून लेखी स्वरूपात मागण्या स्वीकारल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना पक्षनिरीक्षक अविनाश आदिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग याठिकाणी आहे. त्यादृष्टीने आगामी काळात या जिल्ह्यामध्ये निर्णय घेतले जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम आणि नांदेड जिल्ह्याचे पक्षाचे प्रभारी जयप्रकाश दांडेगावकर या ज्येष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतले जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांना नांदेड जिल्ह्यातील संपुर्ण अहवाल सुपूर्द केला जाईल. त्यानंतर संघटनात्मक पदासंदर्भात निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. तर पक्षनिरीक्षक रविंद्र तौर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल. ग्राऊंड लेव्हलपर्यंत पक्षाचे संघटन वाढविले जाईल, असेही त्यांनी सांगितले

यांची होती उपस्थिती

.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्ह्याचे प्रभारी निरीक्षक जयप्रकाश दांडेगावकर, पक्ष निरीक्षक रविंद्र तौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा नांदेड ग्रामीण प्रभारी अध्यक्ष डॉ. सुनील कदम, हरिहरराव भोसीकर, मनपाचे माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे पाटील यांची उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नांदेडला विधीमंडळामध्ये, शासकीय समित्यामध्ये स्थान दिले जाईल. निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. याची खबरदारी घेतली जाईल, असेही पक्षनिरीक्षक अविनाश आदिक यांनी सांगितले.

यापुर्वी नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैभव होते

नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात होत्या. आमदार व पक्षाची ताकद वेगळी होती. सध्याही स्थानिक संस्थेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. पक्षाची राजकीय ताकद वाढविण्यासाठी पुढील काळामध्ये योग्य पद्धतीचे नियोजन केले जाईल, यापुर्वी नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैभव होते. ते परत मिळवण्यासाठी व योग्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निर्णय घेतले जातील, आम्ही कमी आहोत म्हणणार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास तपासावा असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना नांदेड जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.

loading image
go to top