esakal | देशाची एकात्मता, अखंडता अबाधीत राखण्यासाठी सुरक्षा बलांची आवश्यकता- कमांडंट लीलाधर महरानिया
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

 मुदखेड शहरातील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत ७४ स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

देशाची एकात्मता, अखंडता अबाधीत राखण्यासाठी सुरक्षा बलांची आवश्यकता- कमांडंट लीलाधर महरानिया

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड शहरातील केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या प्रशिक्षण महाविद्यालयात आज देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रशिक्षण संस्थेत नव्याने नुकतेच रुजु झालेले कमांडंट लिलाधर महरानिया यांचे हस्ते सकाळी नऊ वाजता केंद्रातील क्वार्टर गार्ड येथे मानवंदना घेऊन तिरंगा ध्वज फडकवला आणि ध्वजास सलामी दिली.

यावेळी संस्थेचे कमांडंट सर्व अधिकारी, अधिनस्त अधिकारी जवान उपस्थीत होते. यावेळी त्यांच्या कुटुंबास स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कमांडेट महरानिया म्हणाले की, ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या संघर्षात आपल्या प्राणांची आहुती दिली त्या देशभक्तांना नमन करून श्रद्धांजली वाहिली. त्या देशभक्तांनी आपली आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशाला स्वातंत्र्य मिळून आज देशातील नागरिकांची रक्षा करण्यासाठी, देशाची एकात्मता आणी अंखडता आबाधीत राखण्यासाठी देशातील सुरक्षेसाठी बलिदान दिलं आहे, अशा प्रकारची भावना देशातील सर्व जवानांमध्ये आणि नागरिकांत होणे गरजेचे आहे. याच्या ऐवजी आपण सर्व मिळून देशा विरूद्ध होत असलेल्या शक्तींचा मुकाबला करून ताबडतोब उत्तर दिले पाहिजे. तरच आपला देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल असेही ते म्हणाले.

हेही वाचा -  कोरोना ब्रेकिंग : 87 व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी, 196 बाधितांची भर तर चोघांचा मृत्यू
  
जवानांना मिठाईचे वाटप

स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचीत कमांडंट लिलाधर महरानिया यांच्या हस्ते उपस्थीत सर्व अधिकारी आणि जवाणांना मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पदक प्राप्त केलेल्या अधिकारी यांची नावाने ओळख करुण घेतली व त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. महरानिया पुढे म्हणाले की, संपूर्ण देश कोविड- १९ महामारिच्या विळख्यात सापडला असून आपणा सर्वांना सतर्क राहून सरकारकडून दिल्या गेलेल्या दिशा निर्देशांच पालन करून बचावात्मक दृष्टीकोनातून स्वतः आणि आपल्या कुटूंबाची सुरक्षेसंबधी काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.  

अधिकाऱ्याची उपस्थिती लक्ष वेधी

देशाच्या स्वातंत्र्य दिनी या संस्थेत कार्यरत असलेल्या सर्वं अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठी लक्ष वेधी होती या मध्ये संस्थेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश कुमार मिश्रा, उपकमांडेट पुरुषोत्तम जोशी, उपकमांडंट समीर कुमार राव, उपकमांडंट कपील बेनीवाल, सहाय्यक कमांडंट जगन्नाथ उपाध्याय, सहाय्यक कमांडट रुपेश कुमार, सहा कमांडंट (मंत्रा) पुरुषोत्तम राजगडेकर यांचे सह केंद्रात कार्यरत असलेले सर्व अधिनस्थ अधिकारी व जवानांनी सामाजीक अंतर ठेवित फेस शिल्ड, मास्क वापरुण उपरिस्थिती लावली होती.

येथे क्लिक करामहिलांसाठी चांगली बातमी : स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस ॲपचे अनावरण

कोविडमुळे नागरिकांची नव्हती उपस्थिती 

या केंद्रातील होणारा प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाचा आनंददायी सोहळा पाहण्यासाठी प्रतिवर्ष सर्व सामान्य नागरीकांना पहावयास खुला असतो. परंतु या वर्षी कोविड-१९ या महामारीने जगभर थैमान घातले आहे. देशाची सुरक्षा ठेवणाऱ्यांची सुरक्षा रहाण्यासाठी पहिल्यांदाच केंद्राबाहेरील नागरीकांना प्रवेश दिला गेला नाही म्हणुन हा नेत्रदिपक सोहळा पाहायला मिळाला नाही.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image