
नांदेड : शेतकरी आंदोलन, कोरोना काळातील भूमिका, महागाई रोखण्यात अपयश आल्यामुळे भाजपतर्फे जनतेमध्ये दृष्टिभ्रम निर्माण करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेऊन घोटाळे बाहेर काढण्याचा आविर्भाव केला जात असल्याची टीका शिवसेनेच्या उपनेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली. विधानसभेच्या देगलूर - बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारासाठी त्या मंगळवारी (ता.२६) येथे आल्या होत्या. पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, २०१४ मध्ये आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. २०१९ मध्ये युती झाली. परंतु, त्यांनी शिवसेनेला दिलेला (Deglur Bypoll) शब्द न पाळल्याने युती फिसकटली. देशाच्या राजकारणाला कलाटणी देण्याचे काम महाराष्ट्राने करून महाविकास आघाडी (Nanded) निर्माण केली.
महाविकास आघाडीचे सरकार पडेल, असे भाजपतर्फे वारंवार सांगितले जात आहे. परंतु, त्यांना त्यात यश आले नाही. आता भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. तो कितपत यशस्वी होईल, हे सांगता येत नाही. कोरोनाकाळात महाविकास आघाडी सरकारने अनेक उपक्रम राबविले. एकंदरीतच डावपेच न करणारे हे सरकार असून, भाजपने कितीही घोटाळे बाहेर काढले तरी, त्यांचे सत्तेचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, असेही त्या म्हणाल्या. शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर तसेच दत्ता पाटील कोकाटे, आनंद पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, अशोक उमरेकर, सचिन किसवे, प्रकाश मारावार आदी उपस्थित होते.
भाजपची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झाली आहे. भाजप आपल्या खिशात आगपेटी घेऊन फिरत आहे. इतरांच्या घरात आग लावणे, आग लावता आली नाही तर आरोप करीत सुटणे, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे, हा भाजपचा उद्योग झाला आहे.
- नीलम गोऱ्हे, विधान परिषदेच्या उपसभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.