नवीन अध्यासन व संशोधन केंद्र महापुरुषांच्या नावाने होणार, कुठे? ते वाचाच 

File photo
File photo

नवीन नांदेड : राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचाराने विद्यार्थी प्रेरित व्हावेत, त्यांच्यावर संशोधन कार्य व्हावे, या हेतूने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अध्यासन व संशोधन केंद्र सुरू करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले या महापुरूषांच्या नावाने हे नवीन अध्यासन व संशोधन केंद्र सुरू होणार आहे. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामत अधिसभा बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या  नावाने अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली आहे. परंतु हे केंद्र सुरू करताना विद्यापीठाच्या तिजोरीवर ताण पडणार याची दक्षता घेत विद्यापीठाने यासंदर्भात लागणारा निधी देण्याबाबत जनतेला, सेवाभावी संस्था व व्यक्तींकडून निधी उभा करण्याचे ठरविण्यात आले आहे.  

यापूर्वी विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, गुरूगोविंदसिंघ अध्यासन व संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. दरम्यान विद्यापीठ परिसरात विविध अध्यासन केंद्रे सुरू करण्यासाठीच्या प्रचलित अध्यासन निर्मितीचे धोरणानुसार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचे नावे अध्यासन व संशोधन केंद्राचे प्रस्ताव दाखल करावेत, असे विद्यापीठाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

सावित्रीबाईंच्या विचारांच्या लेखी घडतील
चुल आणि मुल या संकल्पनेतून महिलांना मुक्त करून स्त्री शिक्षणाची दारे खुली करणार-या  शिक्षणाची क्रांती घडवणार-या पहिल्या महिला आद्यशिक्षिका क्रांती ज्योती साविञीबाई फुले यांचा स्त्री शिक्षणाविषयीचा संघर्ष मोठा खडतर होता.आज महिलांनी खगोलशास्त्रज्ञ ते अंतराळवीर पर्यत झेप घेतली याच श्रेय साविञीबाई फुलेना जाते. त्यामुळे या संशोधन केंद्रातून अनेक साविञीमाईच्या जिवनाप्रवास वाचून साविञीबाईच्या विचाराच्या लेकी घडतील.

समतावादी विचारांची फळी तयार होईल
राष्ट्रनिर्मितीसाठी शैक्षणिक क्षेञात या महापुरुषांचे योगदान हे आम्हा विद्यार्थीसाठी प्रेरणादायी, आयुष्याला नवी ऊर्जा आणि दिशा देणारे असेल या संशोधन केंद्रातुन अनेक संशोधनांबरोबरच समतावादी विचारांची  राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारी फळी निर्माण होईल. शिक्षणाचे महत्व खऱ्या अर्थाने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जानले. अंधःकारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. स्त्री शिक्षणाला राजाश्रय दिला. गोर-गरिब मुलांसाठी वसतिगृह काढलीत.  

महापुरुषांचा अभ्यास करण्याची मोठी संधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य चेतनावर्धक, उत्साहवर्धक आहे. स्त्रीविषयक दृष्टिकोन, महाराजांचा राज्यकारभार, युध्दनिती, प्रशासन, अर्थशास्त्र, स्थापत्यातील योगदान हे उल्लेखनिय व संशोधात्मक आहेत. त्यामुळे या केंद्रातून अनेक अभ्यासक व संशोधकांची शिवविचारांची फौज निर्माण होणार आहे.
- सुचिता पाटील जोगदंड (विद्यार्थिनी) 

विद्यापीठाचा निर्णय स्वागतार्हच
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या नावाने अभ्यासकेंद्र चालू करण्याचा विद्यापीठाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. विद्यार्थी या अभ्यासकेंद्रात संशोधन करून आजपर्यंत आपल्यासमोर न आलेल्या व गौरवशाली इतिहासात दडून बसलेल्या गोष्टींचा उहापोह करू शकतील.  
- पवन कमल शंकर वडजे (विद्यार्थी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com