

Sindkhed Police Issue Safety Guidelines for New Year 2026
sakal
माहूर (नांदेड ) : ३१ डिसेंबर रोजी जुने वर्ष निरोप देत नवीन वर्ष २०२६ चे स्वागत करताना आनंद साजरा करावा; मात्र तो शिस्तबद्ध, सुरक्षित व कायद्याच्या चौकटीतच असावा, असे आवाहन सिंदखेड पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असून सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीत विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.