
या निवडणूकीसाठी दोन दिवसात एकही अर्ज आला नसल्याने राजकिय पक्षातील उमेदवार मुहूर्त शोधत आहेत. तर काही जण हायकंमाडच्या आदेशाची प्रतिक्षा करत आहेत.
नांदेड : महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१नियम - १९ प्रमाणे अदिकाराचा वापर करुन आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संस्था लातूर व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेनी निवडणूक निर्णय अधिकारी लतिफ पठाण यांच्या मान्यतेनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीसाठी दोन दिवसात एकही अर्ज आला नसल्याने राजकिय पक्षातील उमेदवार मुहूर्त शोधत आहेत. तर काही जण हायकंमाडच्या आदेशाची प्रतिक्षा करत आहेत.
निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेरवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी २६ फेब्रुवारी ते पाच मार्च असे असून यासाठी लागणारे शेवटच्या
तारखेपर्यंत ही नामनिर्देशन पत्रे दुपारी तीन वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. २६ फेब्रुवारी ते पाच मार्च दरम्यान नामनिर्देशन पत्राची यादी प्रकाशीत केली जाणार आहे.
आठ मार्चला सकाळी १ वाजल्यापासून नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर विधी नामनिर्देशन पत्राची सुची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एक मार्च ते १३ मार्च दरम्यान उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना निशाणी (चिन्ह) चे वाटप केले जआणार आहे. त्यांनंतर दोन एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, चार फेब्रुवारीला मतमोजणी व निकाल घोषित केला जाणार आहे.