नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही, गुरुवारी ३९ अहवाल पॉझिटिव्ह 

प्रमोद चौधरी
Thursday, 10 December 2020

गुरुवारी (ता. १०) प्राप्त झालेल्या अहवालात ४६ बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली असून, ३९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमीजास्त होताना दिसत असून सलग दुसऱ्या दिवशी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. गुरुवारी (ता. १०) प्राप्त झालेल्या अहवालात ४६ बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली असून, ३९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

गुरुवारी (ता. १०) प्राप्त झालेल्या एक हजार अहवालांपैकी ९५२ निगेटिव्ह, ३९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २० हजार ७२८ एवढी झाली आहे. यातील १९ हजार ६५२ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. रुग्णालयात औषधोपचार सुरु असलेल्या बाधितांपैकी ११ रुग्णांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याने एकूण मृत्यूंची संख्या ५५४ वर स्थिर आहे.  

हेही वाचा - नांदेड : शेतकर्‍यांना लाखोंचा गंडा घालणारा व्यापारी काचावार पसारच

बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय - ११, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण - २०, किनवट कोविड रुग्णालय - एक, खासगी रुग्णालय - १०, देगलूर - एक आणि नायगाव - तीन असे एकूण ४६ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. 

हे देखील वाचाच - चांगली बातमी : 46 तलाठ्यांना लवकरच सज्जांची जबाबदारी- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

गुरुवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात २२, अर्धापूर - दोन, कंधार - पाच, नायगाव - एक, परभणी - एक, देगलूर - दोन, बीड - एक, लातूर - एक, हदगाव - तीन एकूण ३९ बाधित आढळले. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३२७ कोरोना बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २३, जिल्हा रुग्णालय २९, जिल्हा रुग्णालय नवी इमारत २९, मुखेड २१, भोकर - दोन, हदगाव सहा, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५५, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १३७, खासगी रुग्णालयात २५ असे एकूण ३२७ कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. 
 
कोरोना मीटर ः 

  • गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ३९ 
  • गुरुवारी कोरोनामुक्त - ४६ 
  • गुरुवारी मृत्यू- शून्य 
  • एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २० हजार ७२८ 
  • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १९ हजार ६५२ 
  • एकूण मृत्यू संख्या- ५५४ 
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ४३२ 
  • अतिगंभीर रुग्ण - ११ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Corona Patient Deaths For The Second Day Nanded News