रक्षाबंधनानिमित्त : आमदार हंबर्डे यांनी घेतली कोवीड सेंटरमधील महिला रुग्णांची भेट

श्‍याम जाधव
Monday, 3 August 2020

सोमवारी नांदेड दक्षिणचे कार्यशील आमदार मोहन हंबर्डे यांनी प्रत्यक्ष श्री. गुरूगोविंदसिंघजी कोवीड सेंटर व पंजाब भवन येथील कोवीड सेंटरला भेट देऊन पाहणी करत तेथील रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या

नांदेड : कोवीड सेंटरच्या संदर्भात रुग्णांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सोमवारी (तीन) नांदेड दक्षिणचे कार्यशील आमदार मोहन हंबर्डे यांनी प्रत्यक्ष श्री. गुरूगोविंदसिंघजी कोवीड सेंटर व पंजाब भवन येथील कोवीड सेंटरला भेट देऊन पाहणी करत तेथील रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी त्यांनी कोरोनारुपी संकटाला हरवण्यासाठी रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

रक्षाबंधनाच्या दिवशी ता.३ सोमवारी सकाळी आमदार हंबर्डे यांनी विष्णुपुरी येथील श्री गुरूगोविंदसिंघजी कोवीड सेंटर येथे पीपीई किट परिधान करत प्रत्यक्ष पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.आमदार हंबर्डे हे ‌ काही दिवसांपूर्वीच कोरोना मुक्त झाले.त्यामुळे त्यांना या आजाराबद्दल माहिती असल्याने त्यांनी पॉझिटिव्ह रुग्णांची आस्थेवाईकपणे  चौकशी केली.यावेळी त्यांना कित्येक माता-भगिनींना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे दिसून आले. संसर्ग झालेल्या या माता-भगिनींना भेटून आज रक्षाबंधनाच्या दिवशी तुमचा आमदार भाऊ तुमच्या प्रत्यक्ष भेटीला आला आहे.

हेही वाचा -  अट्टल गुन्हेगार विक्की चव्हाण गोळीबारात ठार

आमदार हंबर्डे यांनी संबंधित प्रशासनास आवश्यक त्या सूचना केल्या

तुमच्या कोणत्याही समस्येसाठी मी माझ्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असून आपले प्रशासनही कोरोना रुग्णांची आवश्यक ती काळजी घेत असल्याचे आमदार हंबर्डे यांनी यावेळी म्हणाले.त्यानंतर आमदार हंबर्डे यांनी पंजाब भवनसह शिवाजी पुतळा समोर असलेल्या 200 काॅटच्या नवीन कोवीड  सेंटरला भेट देऊन पाहणी केली.यावेळी आमदार हंबर्डे यांनी संबंधित प्रशासनास आवश्यक त्या सूचना केल्या.त्यांच्यासमवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर,डॉ. बिसेन, डॉ. सिंगल, नरसिंग हंबर्डे, राजू मोरे, शिवप्रसाद कुबडे, प्रकाश दिपके यांच्यासह येथील डॉक्टरांची टीम  उपस्थिती होती.

लवकरच या कोरोना रुपी संकटातून मुक्त होऊ अशी आशा व्यक्त केली

रक्षाबंधनाच्या दिवशी आमदार मोहन हंबर्डे यांनी प्रत्यक्ष कोविंड सेंटरला भेट दिल्यानंतर तेथे  कोरोना संसर्ग झालेल्या महिलांना आमदार हंबर्डे यांना राखी बांधण्याचा मोह आवरला नाही.परंतु प्रत्यक्ष तेथे राखी उपलब्ध नसल्याने या महिलांनी आमदार हंबर्डे यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.आमदार हंबर्डे यांनीही काळजी करू नका आपण लवकरच या कोरोना रुपी संकटातून मुक्त होऊ अशी आशा व्यक्त केली.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the occasion of Rakshabandhan: MLA Humberde visited female patients at Kovid Center nanded news