esakal | नांदेडच्या उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खासगी रुग्णालयात उपचार सुरु, संपर्कातील परिवार, व कर्मचारी  क्वारंटाईन

नांदेडच्या उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी व कोरोना योद्ध्यांनी आपल्यासह समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. पहिल्या लाॅकडाउनपासून आजपर्यत अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीनाकाबंदी व जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या राज्य उत्पादन शुल्कच्या एका तरुण अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली. त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात चिकाळा तांडा (ता. मुदखेड), वाजेगाव व नांदेड शहरामध्ये अवैध देशी, विदेशी, हातभट्टी विकणाऱ्यंवर कारवाई करुन लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. अधिक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार यांच्या पथकानी कारवाई करुन अनेकांवर गुन्हे दाखल केले. हे अधिकारी यातून लवकर बरे होतील अशी आशा नांदेडकर व्यक्त करत आहेत.

शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून लाॅकडाऊन लावण्यात आला होता. या लाॅकडाऊनची शहर व जिल्ह्यात अवैध दारु विक्री होउ नये यासाठी श्री. मंडलवार हे नेहमी सक्रीय असतात. शहरातील विविध भागात व ग्रामिण परिसरात त्यांचा गुन्हेगारांवर चांगलाच वचक आहे. त्यांनी चिकाळा तांडा परिसरात मागील महिण्यात रात्री कारवाई करतांना ते जखमीही झाले होते. त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असताना मात्र त्यांनी पाठलाग करुन हातभट्टी दारु विक्री करणाऱ्या टोळीला अटक करुन लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. आज घडीला जिल्ह्यात दीड हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण बाधीत झाले. यात सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही फटका बसला. फ्रन्टलाईनवर लढणारे सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी यात सुटले नाही. 

हेही वाचा या शहरात साकारणार शांतीचे आकर्षक प्रतिक, कोणत्या ते वाचा..?

राज्य उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ 

जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम एकजुटीने या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. २४ तास नांदेडकरांच्या  सेवेत राहणाऱ्या दुय्यम निरिक्षक भगवान मंडलवार या अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल गुरुवारी (ता. ३०) रात्री नऊच्या सुमारास पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली. राज्य उत्पादन शुल्क विभागात कोरोनाची बाधआ झालेल श्री. मंडलवार हे पहिले अधिकारी आहेत. 

नांदेडकरांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे

गुरुवारी बाधीत झालेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नांदेडच्या शिवाजीनगर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाचा सामना पोलिस दलातील काही अधिकारीही करत आहेत. चार दिवसांपासून उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के हे शहराच्या पावडेवाडी नाका भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट व मास्क, सॅनिटायझर व रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधी देणे आवश्यक आहे. नांदेड शहरात सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असतांना नांदेडकरांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.