इंडिका कारसह एक लाख चौदा हजाराची विदेशी दारू जप्त- मुदखेड पोलिसांची कारवाई

गंगाधर डांगे
Sunday, 13 September 2020

मुदखेड शहरात शिवाजीनगर भागात राहत असलेल्या मुदखेड शहरातील एका प्रमुख पक्षाचा पदाधिकारी मुदखेड शहरात विदेशी दारूचा व्यवसाय खुलेआम करत असल्याची माहिती मागील अनेक दिवसांपासून मुदखेड पोलिसांना होती परंतु हा व्यक्ती एका पक्षाचा प्रमुख पदाधिकारी असल्यामुळे यावर ती कारवाई करण्यात मुदखेड पोलीस धजावत नव्हती.

 

 

मुदखेड (जिल्हा नांदेड) : शिवाजीनगर मुदखेड परिसरात एका इंडिका कार वरती नजर ठेवून कारवाई केली असता या कारवाईत इंडिका कारसह विदेशी दारू पकडून मुदखेड पोलिसांनी एकाविरुद्ध शनिवारी (ता. 12) कारवाई केली आहे.

मुदखेड शहरात शिवाजीनगर भागात राहत असलेल्या मुदखेड शहरातील एका प्रमुख पक्षाचा पदाधिकारी मुदखेड शहरात विदेशी दारूचा व्यवसाय खुलेआम करत असल्याची माहिती मागील अनेक दिवसांपासून मुदखेड पोलिसांना होती परंतु हा व्यक्ती एका पक्षाचा प्रमुख पदाधिकारी असल्यामुळे यावर ती कारवाई करण्यात मुदखेड पोलीस धजावत नव्हती.

ठाण्याच्या हद्दीत व शहराच्या परिसरात मोठ्या कारवाया

मागील काही दिवसांपूर्वी मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी मुदखेड पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतला तेंव्हापासून ठाण्याच्या हद्दीत व शहराच्या परिसरात मोठ्या कारवाया करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करत एक वेगळीच छाप उमटवली आहे.

हेही वाचा - ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील होते सदाबहार व्यक्तीमत्व -

वाळू माफियांचे धाबे दणाणून सोडले

पाच सहा दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांना गोदावरी नदीतुन बोटद्वारे वाळू उपसा होत असल्याची मिळालेल्या माहिती आधारे वाळू माफियांवर कारवाई करून वाळू माफियांचे धाबे दणाणून सोडले. यानंतर शनिवारी एका कारमधून मुदखेड शहरात विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून कारवाई केली.

एक लाख 13 हजार 920 रुपयाचा माल जप्त

या कारवाईमध्ये इंडिका कार (एम.एच.२६--एल-२९३५) या वाहनांमध्ये विदेशी दारु म्यकडॉल  न.१ चे ४८ बाटली व इम्पेरिअल ब्ल्यू चे ४८ बाटल एकूण किंमत 13 हजार 920 व इंडिका कार एक लाख असा एकूण एक लाख 13 हजार 920 रुपयाचा माल जप्त केला. यावरून मुदखेड पोलिसांनी आरोपी सुधाकर बाबुराव सूर्यवंशी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला. 

सदरील कारवाई पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले, रमेश खाडे, पंडित राठोड, किरण तेलंगे, रवी लोहाळे, माधव पवार यांनी केले. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh and fourteen thousand foreign liquor seized along with Indica car Mudkhed police action nanded news