esakal | रविवारी एक हजार १८६ जण पॉझिटिव्ह ; २७ बाधितांचा मृत्यू ः महापालिकेंतर्गत गृविलगीकरणात पाच हजार रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

रविवारी (ता. चार) तीन हजार ८४४ पैकी, दोन हजार ५५८ निगेटिव्ह, एक हजार १८६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचे एकुण प्रमाण ४७ हजार ६६९ इतके झाले आहे. 

रविवारी एक हजार १८६ जण पॉझिटिव्ह ; २७ बाधितांचा मृत्यू ः महापालिकेंतर्गत गृविलगीकरणात पाच हजार रुग्ण 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - शहर व तालुक्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत महापालिकेंतर्गत सध्या पाच हजार १८१ तर, तालुक्यातंर्गत गृह विलगीकरण कक्षात एक हजार ७५७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र गृह विलगीकरणातील सर्वच बाधित रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाप्रमाणे बाधिताची काळजी घेत असतील का? यावर शंका उपस्थित केली जात आहे. 

शनिवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी रविवारी (ता. चार) तीन हजार ८४४ पैकी, दोन हजार ५५८ निगेटिव्ह, एक हजार १८६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचे एकुण प्रमाण ४७ हजार ६६९ इतके झाले आहे. 

हेही वाचा-  नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचा दणका : एका खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल; अनेकांचे धाबे दणाणले

यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार होते सुरु

रविवारी कान्हेगाव ता. हदगाव महिला (वय ६४), कहाळा ता. नायगाव पुरुष (वय ७०), देगलूर नाका नांदेड पुरुष (वय ४५), बसवेश्‍वर नगर नांदेड महिला (वय ३८), लोहा महिला (वय ७५), सिडको नांदेड महिला (वय ६७), धनेगाव महिला (वय ५६), लोहा महिला (वय ६०), चिखलवाडी नांदेड पुरुष (वय ७२) यांच्यावर विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात, शिवाजीनगर पुरुष (वय ६३), सनमित्र कॉलनी पुरुष (वय ५१), तरोडा (खु.) पुरुष (वय ७५), अर्धापूर महिला (वय ७२), जयभिमनगर नांदेड महिला (वय ६०), वसंतनगर नायगाव महिला (वय ६०), सांगवी नांदेड महिला (वय ६०), फरांदेनगर नांदेड पुरुष (वय ५५), नवी आबादी नांदेड पुरुष (वय ४८), बांधकामनगर नांदेड महिला (वय ५५), हिंगोली नाका नांदेड पुरुष (वय ५८) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात,

हेही वाचा- नांदेड : गावठी पिस्तुलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एक हजार १८६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

रवि नगर उमरी महिला (वय ८२), इब्राहिमनगर देगलूर पुरुष (वय ५६), मुदखेड पुरुष (वय ९४), कुंटुर तालुका नायगाव पुरुष (वय ४९), कंधार स्मशानभूमी कंधार महिला (वय ६५) या पाच रुग्णांवर तालुक्यातील शासकीय कोविड सेंटरमध्ये तर रुई कंधार पुरुष (वय ८५) व रविनगर तरोडा पुरुष (वय ७९) यादोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना वरील २७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्हाभरात ८९६ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - ५५२, नांदेड ग्रामीण - ४४, बिलोली २२ , हिमायतनगर १९ , मुखेड ५७, कंधार ३९, मुदखेड ४३, देगलूर १९, नायगाव ५८, किनवट ६८, अर्धापूर ४२, धर्माबाद ४०, लोहा ६४, हदगाव २२, भोकर ३८, माहूर चार, उमरी ४५, यवतमाळ दोन, परभणी सात, आदिलाबाद एक असे एक हजार १८६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
 

loading image