esakal | एक हजार २५५ जण कोरोनाबाधित; २६ जणांचा मृत्यू; दहा हजार ७८३ रुग्णांवर उपचार सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

बुधवारी एक हजार १४२ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.४१ टक्के आहे.

एक हजार २५५ जण कोरोनाबाधित; २६ जणांचा मृत्यू; दहा हजार ७८३ रुग्णांवर उपचार सुरू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्याभरातील प्राप्त झालेल्या चार हजार ५३४ अहवालापैकी एक हजार २५५ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या पन्नास हजार ८९२ एवढी झाली असून यातील ३८ हजार ८९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या दहा हजार ७८३ रुग्ण उपचार घेत असून १८९ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

ता. तीन ते ता. सहा एप्रिल दरम्यान २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ९७० झाली आहे. ता. तीन एप्रिलला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील पुरुष (वय ६५), वात्सल्य नगर नांदेड पुरुष (वय ४६), जुना मोंढा नांदेड पुरुष (वय ६२), शिवाजीनगर नांदेड पुरुष (वय ९०) ता.चार एप्रिल चैतन्यनगर नांदेड महिला (वय ६५), अर्धापूर तालुक्यातील चांभरा पुरुष (वय ७५), नांदेड महिला (वय ७०), किनवट तालुक्यातील इस्लापूर महिला (वय ६५), चौफाळा नांदेड महिला (वय ५८), सिडको नांदेड पुरुष (वय ४२), चैतन्य नगर नांदेड महिला (वय ७५), (ता. पाच ) एप्रिल शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील निळा येथील पुरुष (वय ७०), जुना मोंढा नांदेड महिला (वय ६०), देगलूर रुग्णालयातील टाकळीझरी वर्षाचा पुरुष (वय ६०), नायगाव तालुक्यातील शेळगाव महिला (वय ५०), भगवती रुग्णालय वजिराबाद नांदेड येथील पुरुष (वय ३२), तरोडा बु. नांदेड पुरुष (वय ४०), तिरुमला कोविड रुग्णालय नांदेड महिला (वय ७०), (ता. सहा) एप्रिल हदगाव कोविड रुग्णालय आझाद चौक पुरुष (वय ५७), भक्ती कोविड रुग्णालय कल्याण नगर येथील पुरुष (वय ५२), गोदावरी कोविड रुग्णालय फरांदे नगर नांदेड येथील पुरुष (वय ७२), लोट्स कोविड रुग्णालय सुमेधनगर नांदेड पुरुष (वय ६८), आश्विनी कोविड रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथील पुरुष (वय ७३), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथील गोकुळ नगर देगलूर येथील पुरुष (वय ५२), धर्माबाद पुरुष (वय ४३), देगलूर पुरुष (वय ७६) असे एकूण २६ रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले. 

हेही वाचा- रेणुका देवी गडावर भीषण अग्नितांडव; मंदिर संस्थान व 125 व्यापारी प्रतिष्ठाने बचावली

दहा हजार ७८३ रुग्ण उपचार सुरु

बुधवारी एक हजार १४२ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.४१ टक्के आहे. बुधवारी नांदेड महापालिका क्षेत्रात ५०६, नांदेड ग्रामीण ४३, देगलूर ५८, कंधार ८४, मुदखेड आठ, हिंगोली चार, धर्माबाद ३१, किनवट १०२, यवतमाळ १, अर्धापूर ३९, हदगाव ८६, बिलोली २१, लोहा २०, मुखेड ५२, नायगाव ५०, उमरी २६, भोकर ४३, हिमायतनगर ३१, माहूर पाच, परभणी चार, यवतमाळ एक असे एकूण एक हजार २५५ बाधित आढळले. एकूण दहा हजार ७८३ रुग्ण उपचार घेत आहेत. 

हेही वाचा- नांदेड : ११ एप्रिल रोजी वंचितच्या वतिने मोर्चा; काय आहे कारण ? फारुक अहमदचा इशारा

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - ५० हजार ८९२ 
एकूण बरे - ३८ हजार ८९१ 
एकुण मृत्यू - ९७० 
बुधवारी पॉझिटिव्ह - एक हजार २५५ 
बुधवारी कोरोनामुक्त - एक हजार १४२ 
बुधवारी मृत्यू - २६ 
उपचार सुरु - १० हजार ७८३ 
प्रलंबित स्वॅब -३८४ 
अतिगंभीर प्रकृती -१८९ 

loading image