esakal | नांदेड जिल्ह्यात तूर विक्रीसाठी एक हजार ७४४ शेतकऱ्यांची नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शेतकऱ्यांनी पिक पेरा नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड तसेच बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन खरेदी केंद्रात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

नांदेड जिल्ह्यात तूर विक्रीसाठी एक हजार ७४४ शेतकऱ्यांची नोंदणी

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर/ प्रल्हाद कांबळे

नांदेड : केंद्राच्या किमान हमी दरानुसार तूर विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार ७४४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातून मिळाली. जिल्ह्यात दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तसेच महाफार्मर प्रोड्यूसर कंपनी या तीन यंत्रणेच्या माध्यमातून २८ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु होणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या २८ तारखेपासून जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली.

शेतकऱ्यांनी पिक पेरा नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड तसेच बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन खरेदी केंद्रात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या नांदेड जिल्हा फळे भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या केंद्रावर ४५
शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

हेही वाचानांदेडला गुरु गोविंदसिंघजी प्रकाशपर्वनिमित्त मुख्य गुरूद्वारात धार्मिक सोहळा

तर सहकारी खरेदी विक्री संघ मुखेड ४४, सहकारी खरेदी विक्री संघ हदगाव ५४४, सहकारी खरेदी विक्री संघ बिलोली १२, पंडित दीनदयाळ अभिनव सहकारी संस्था देगलूर २८, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट ३८७, किनवट तालुका कृषी प्रक्रिया संस्था गणेशपुर १८५, विदर्भ विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव येथे २७, भोकर संशोधन फार्मर प्रोड्यूसर कंपनी २४५, सहकारी खरेदी विक्री संघ धर्माबाद दोनशे, असे एकूण ४७२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

महाएफपीसी कंपनीच्यावतीने केवळ शेवंतामाता फार्मर प्रोड्युसर कंपनी, निवघा बाजार येथे २० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक हजार ७४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातून मिळाली. सध्या बाजारात तुरीला पाच हजार आठशेपर्यंत दरअसल्यामुळे तुरीसाठी नोंदणी कमी होत असल्याची माहिती मिळाली.

loading image