Nanded News : एक हजार ८४९ वीजग्राहक करतात वीजनिर्मिती

जिल्ह्यात हरित ऊर्जेला प्राधान्य; रूफटॉप सोलर योजनेला ग्राहकांची पसंती
Nanded solar
Nanded solar sakal

नांदेड : हरितऊर्जा निर्मितीला प्राधान्य देत घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि अतिरिक्त वीज निर्मिती झाली तर ती महावितरणला विकायची या रूफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यातील एक हजार ८४९ वीज ग्राहकांकडून एकूण २६ हजार ३६१ किलोवॅट क्षमतेच्या वीज निर्मितीचा टप्पा गाठण्यात आला आहे. या ग्राहकांना वीजबिलांपासून मुक्त मिळाली असून ते केवळ वापर करणारेच नाही तर वीजनिर्मातेही झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले आहे.

जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मितीला पसंती दर्शवली आहे. एकूण एक हजार ८४९ वीजग्राहकांनी विविध एजन्सीच्या सहाय्याने सौरऊर्जा निर्मिती संच स्थापित केले आहेत.

यामध्ये सर्वाधिक नांदेड शहर विभागातील एक हजार ५२६ तर देगलूर विभागातील १५६, भोकर विभागातील ८९ आणि नांदेड ग्रामीण विभागातील ७८ वीज ग्राहकांनी या योजनेला पसंती दिली आहे.

Nanded solar
Nanded Election : काँग्रेसने भाकरी फिरविली; तेरापैकी आठ नव्या चेहऱ्यांना संधी

सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी एक ते तीन किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि तीन किलोवॅटपेक्षा अधिक ते दहा किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते.

त्याचबरोबर सामुहिक वापरासाठी पाचशे किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी दहा किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येते.

सौरऊजेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते.

यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे.

Nanded solar
Nanded : एकाधिकारशाही मोडून परिवर्तनाला साथ द्या ; खा. प्रताप पाटील चिखलीकर

महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा स्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात बचत होते. तसेच नेट मिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. त्यामुळे वीज ग्राहकांसाठी फायद्याची व पर्यावरणला हातभार लावणारी योजना आहे.

- अनिल डोये, मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com