नांदेडमधील खडकपूरा भागात एकाचा भोसकून खून

प्रल्हाद कांबळे
Thursday, 6 August 2020

शुल्लक कारणावरुन मारहाण होताना अनेकांनी का मारत आहेस असे विचारले. एवढेच नाही तर चक्क पोलिस घटनास्थळावर येईपर्यंत तो जागचा हालला नाही. पोलिसानी त्याला ताब्यात घेतले आहे.

नांदेड : रागाने माझ्याकडे का पाहिले म्हणून चक्क एकाने आपल्याच परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीचा भरदुपारी अनेकांच्या समोर चाकुने सपासप वा करुन निर्घृण केला. शुल्लक कारणावरुन मारहाण होताना अनेकांनी का मारत आहेस असे विचारले. एवढेच नाही तर चक्क पोलिस घटनास्थळावर येईपर्यंत तो जागचा हालला नाही. पोलिसानी त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना शहराच्या खडकपूरा भागात गुरुवारी (ता. सहा) दुपारी चारच्या सुमारास घडली. 

वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडकपूरा येथील महमद सरवर महमद कैसर हा आपल्या खडकपूरा चौकात काही मित्रांना बोलत थांबला होता. यावेळी याच भागात राहणारा नयुमखान अयुबखान उर्फ मड्डीदादा हा तेथून घराकडे जात होता. यावेळी महमद सरवरने त्याच्याकडे पाहिले. याचा राग मनात धरुन मड्डीदास आपल्या घरात गेला. लगेच हातात चाकु घेऊन आला. महमद सरवरला माझ्याकडे का पाहिलास म्हणून वाद घातला. एवढेच नाही तर त्याच्या छातीवर, पोटावर चाकुने सपासप वार केले. यावेळी पस्थितीतांनी त्याला का मारत आहेस असे विचारले. तोपर्यंत महमद सरवर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. 

हेही वाचा -  नांदेडात पुन्हा दोन पिस्तुलधारी युवकांना अटक - पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे

आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात 

लगेच तेथील काही नागरिकांनी त्याला उचलून एका ॲटोत बसवून पश्‍चिम वळण रस्तामार्गे विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात नेत असतांना शेख महमद सरवर याचा रस्त्यातच मृत्यू झाला. लगेच त्याला ॲटो चालकाने परत आणले. घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, फौजदार नितीन आगलावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सीक लॅबची टीमही घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. 

मड्डीदादा सारईत गुन्हेगार, पोलिसांची माहिती

पोलिस घटनास्थर येईपर्यंत मड्डीदादा हा तेथेच आल्या हातात चाकु घेऊ थांबून होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वजिराबाद पोलिस ठाण्यात हजर केले. शुल्लक काराणावरुन शेख महमद याचा खून केल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी मड्डीदादा हा या परिसरात राहणाऱ्या मड्डीदादयाची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. वजिराबाद पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One was stabbed to death in Khadakpura area of ​​Nanded