कांद्याचे भाव वधारल्याने ” ये रे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या” असे म्हणण्याची वेळ

रामराव मोहिते
Saturday, 3 October 2020

80 क्विंटल कांदा शेतातील गोठ्यात सुरक्षित साठवून ठेवला असता,  सततच्या पडत असलेल्या पावसामुळे ओसाडा लागून भिजल्याने अंकुर फुटून वाया गेल्याचे चित्र आहे

घोगरी (जिल्हा नांदेड) : पावसाळ्यात “कांदा” वाजवी दरात विकला जाईल या भोळ्या आशेवर असलेल्या ब्रह्मवाडी (ता. हदगाव ) येथील एका तरुण शेतकऱ्याने जवळपास 80 क्विंटल कांदा शेतातील गोठ्यात सुरक्षित साठवून ठेवला असता,  सततच्या पडत असलेल्या पावसामुळे ओसाडा लागून भिजल्याने अंकुर फुटून वाया गेल्याचे चित्र आहे. आता कांद्याचे भाव वधारल्याने” ये रे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या” असे म्हणण्याची वेळ या बळीराजावर येऊन ठेपली आहे.

येथील शेतकरी तातेराव बाबुराव चोंडे (पाटील) यांनी पारंपारिक शेतीला बगल देत शाश्वत शेती करत, प्रथम अर्ध्या एकर शेतीमध्ये कांदा पीक घेतले. त्यातून त्यांना 65 किंटल उत्पन्न मिळाले. सहा ते आठ रुपये किलो दराने कांदा विकूनही त्यांना सर्व खर्च वजा जाता 55 हजार रुपये उत्पन्न मिळाले. इतर पिकाच्या तुलनेत कांद्याचे उत्पन्न चांगले मिळत असल्याचे पाहून त्यांनी गतवर्षी दीड एकर शेतीवर कांदा पीक लागवड केली. योग्य नियोजन होण्याने त्यांना तब्बल दीडशे क्विंटल कांद्याचे भरघोस उत्पन्न मिळाले. यातून आपल्याला चांगली मिळकत मिळेल या आशेवर असलेल्या बळीराजाची पुन्हा घोर निराशा झाली.

हेही वाचा नांदेडला शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा आता विकायचा कुठे?

देशात “कोरोना” विषाणूचा वाढता शिरकाव होण्याने, शासनाच्या वतीने सोशल डिस्टंसिंगचे पालन म्हणून सर्वत्र “टाळेबंदी” लागू झाल्याने, खेडेगावात ही याचे तंतोतंत पालन सुरू झाल्याने, मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा आता विकायचा कुठे? हा यक्षप्रश्न शेतकऱ्याच्या पुढे उभा टाकला. सर्वत्र वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याने, व बाजारपेठाही बंद असल्याने हो नाशिवंत कांदा आता विकायचा कसा? याच विवंचनेत असतानाच, सदर शेतकऱ्यांनी एक युक्ती लढवून खाजगी वाहनाद्वारे गावोगावी,

खेडोपाडी, फिरून जमेल त्या भावाने जवळपास 70 क्विंटल कांदा विकला.

यातून त्यांना कमी-अधिक प्रमाणात का होईना उत्पन्न मिळाले. परंतु राहिलेला कांदा विकण्यास त्यास सवडच मिळाली नाही. पावसाळा लगतच येऊन ठेपल्याने शेती शेतीपूरक कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी बाकीचा शिल्लक राहिला “कांदा” पावसाळ्यात वाजवी दरात विकण्याच्या हेतूने, शेतीत असलेल्या गोठ्यात सुरक्षित साठवून ठेवण्यात आला.

गोठ्यात ठेवलेला जवळपास 80 क्विंटल कांदा भिजल्याने अंकुर फुटून वाया गेला

मृगनक्षत्र पासूनच या परिसरात बर्‍यापैकी पाऊस होण्याने पेरलेल्या कापूस, सोयाबीन, तुर, उडीद, तीळ, या पिकाची उगवण क्षमता ही चांगली झाली. परंतु प्रत्येक ऋतूत वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने , असाच सोसाट्याचा वारा सुरू असताना सदर शेतकऱ्याच्या गोठ्यालगत असलेले बाबळीचे वृक्ष नेमके याच गोठ्यावर पडल्याने, संपूर्ण कांद्यात पाणी होण्याने गोठ्यात ठेवलेला जवळपास 80 क्विंटल कांदा भिजल्याने अंकुर फुटून वाया गेला आहे. “आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची वेळ बळीराजा वर आल्याचे चित्र आहे.

येथे क्लिक कराभरघोस निधी देऊन परभणीचा विकास करू ; मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

आता कांद्याचे भाव गगनाला

परतीच्या पावसाने हाताला आलेले पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे मातीमोल झालं असतानाच, सदर शेतकऱ्यांनी पावसाळ्यात कांद्याला वाजवी दरात भाव मिळेल या आशेने ठेवली असता, नियतीला हे मान्य नसावं. व आता कांद्याचे भाव गगनाला भिडावे? यातून शेतकऱ्यांनी सावरायचे कसे हा एकशे प्रश्न निर्माण झाला आहे.

निसर्गाचा लहरीपणा नित्याचा

या परिसरात निसर्गाचा लहरीपणा नित्याने होत आहे. एवढे असूनही शासनाच्या वतीने या परिसरात “नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत एखादी कांदा चाळ होणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्याची होणारी हानी टाळण्यासाठी मदत होईल.

- पांडुरंग चोंडे, शेतकरी, ब्रह्मवाडी.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onian It's time to dump her and move on nanded news