Video - आॅनलाईन शिक्षणाचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी खडतरच, कसा? ते वाचाच

File photo
File photo

नांदेड : लॉकडाउनच्या काळामध्ये मोबाईलमध्ये डोके घालून बसण्याची अनेकांना सवय लागली आहे. सध्या शासनाकडून विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणाचा जरी पर्याय पुढे येत असला तरी मोबाईलमध्ये तासन तास डोके खुपसून बसणाऱ्यांना डोळे, मान, मणका आणि पाठीचा त्रास जाणवू शकतो. अशावेळी डोळ्यांची काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रेखा पाटील-चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शाळा १५ जून रोजी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना सुरु झाल्या आहेत. असे असले तरी आॅनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना दररोज शाळेतील तासिकांप्रमाणेच प्रत्येक विषयाचे अध्यापन केले जात आहे. त्यामुळे मुलांवर मोबाईल वापराचा काय परिणाम होईल? हा प्रश्‍न अनेक पालकांना पडला आहे. एकमेकांचा संवाद या मोबाईलमुळेच हरवला आणि याची सवय आतापासूनच या विद्यार्थ्यांना लावली तर भविष्यात ही सवय सोडणं अशक्य असल्याचे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - माझा सर्वात महत्वाचा गुरू म्हणजे आई - विजयकुमार मगर

वाढती स्क्रिन टाईम धोक्याचे
आॅनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात अगदी सहज पालकांचा मोबाईल पडत आहे. अगोदरच मुले मोबाईलवर कार्टून किंवा गेम्स खेळण्यात वेळ घालवत असल्याने त्यांची समजूत काढण्यात पालकांची आधीच दमछाक होत आहे. आता तर शाळेतील अभ्यासही मोबाईलवर सुरु झाल्याने पालकांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. परिणामी या वाढत्या स्क्रिन टाईममुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवरही दुष्परिणाम होण्याची शक्यता दाट आहे.

हे देखील वाचा - जिल्हाभरातील दिव्यांग उपकरणांच्या प्रतिक्षेत - ​

२०-२०चा फार्मुला अमलात आणावा
लॉकडाउनमुळे सर्व माध्यमांच्या शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडलेल्या आहेत. त्यावर पर्याय म्हणून आॅनलाईन एज्युकेशन सध्या अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे टॅब, लॅपटॉप, मोबाईल आदींच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहे. हे शिक्षण घेताना डोळ्यावर ताण पडू नये म्हणून २०-२० फार्मुला अमलात आणण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. मोबाईलचा स्क्रिन हा २७ ते २८ इंच खाली असावा. एक ते दोन तासानंतर १५ मिनिटांचा थांबा घ्यायला पाहिजे.डोळ्यांची उघडझाप करणेही तितकेच आवश्‍यक असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रेखा पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे. 

येथे क्लिक कराच - नांदेडकरांनो सावधान : ‘कोरोना’चा पाश आवळला जातोय.​

अभ्यासवर्गांचेही फुटले पेव 
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भरभराट झालेल्या आॅनलाइन शिक्षणाच्या बाजारपेठेला जोडून आॅनलाईन शिक्षण कसे द्यावे? याचे शिक्षकांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा, अभ्यासवर्गाचेही पेव फुटले आहे. कारण सध्या सर्वच माध्यमांच्या शाळांनी आॅनलाईन शिक्षणाचा आग्रह धरला आहे. अगदी पूर्वप्राथमिक वर्गांपासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांपर्यंतचे शिक्षण सध्या आॅनलाइनच सुरु आहे. ई-साहित्य तयार करण्यासाठी काही प्रमाणात शिक्षकांनीही पुढाकार घेतला आहे. मात्र त्याचवेळी संगणक वापराचे प्राथमिक ज्ञानही नसलेला शिक्षकांचा एक मोठा वर्ग आहे. आॅनलाईन शिकवायचे असेल तर शिक्षकांनाच आधी विद्यार्थी होण्याची वेळ आली आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com