
नांदेड : शहरामध्ये मनपा हद्दीत यावर्षी वृक्षगणना करण्यात आली. त्यानुसार केवळ तीन लाख दहा हजार झाडे अस्तित्वात आहेत, तर दुसरीकडे शहरातील आठ लाख लोकसंख्या विचारात घेता ‘एक व्यक्ती एक झाड’ याप्रमाणेसुद्धा पूर्तता करण्यात नांदेडकर कमी पडलेले आहेत. त्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमी व सुजाण नागरिकांनी हरित नांदेड अभियानात जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.