esakal | नांदेड जिल्ह्यात फक्त चार टक्केच पॉझिटिव्ह रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी (ता.२९) एक हजार ५९२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ५०५ निगेटिव्ह तर ७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १९ हजार २७ वर पोहचली आहे. 

नांदेड जिल्ह्यात फक्त चार टक्केच पॉझिटिव्ह रुग्ण 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आले आहे. दोन दिवसांपासून एकही मृत्यू झाला नसल्याने जिल्ह्यातील कोरोना आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ५०४ वर स्थिरावली आहे. गुरुवारी (ता.२९) १०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ७१ पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 

मागील चार महिण्यात झपाट्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र, ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटत आहे. कोरोनामुक्ती होणाऱ्या रुग्णसंख्येत देखील वाढ झाली आहे. बुधवारी (ता.२८) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी (ता.२९) एक हजार ५९२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ५०५ निगेटिव्ह तर ७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १९ हजार २७ वर पोहचली आहे. 

हेही वाचा- प्रवेश रद्द झाल्याने पालकांचा जीव टांगणीला, ‘आरटीई’च्या नवीन नियमावलीचा परिणाम; गुरुवारी शेवटचा राऊंड ​

मृत्यूचा आकडा ५०४ वर स्थिर 

गुरुवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील- दोन, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- पाच, पंजाब भवन, यात्रीनिवास, महसूल भवन आणि होम आयसोलेशनमधील ७०, देगलूर- एक, लोहा- एक, बिलोली- तीन, अर्धापूर - दोन, हदगाव- एक, किनवट- तीन व खासगी रुग्णालयातील - १३ असे १०१ कोरोना बाधित रुग्ण औषधोपचाराने बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. आतापर्यंत १७ हजार ७१७ कोरोना बाधितांनी कोरोना आजारावर यशस्वीरित्या मात केली. मागील दोन दिवसात जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नसल्याने कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा ५०४ वर स्थिर आहे. 

हेही वाचले पाहिजे- निकालाचे अकडे पाहून विकास आराखडा आखत नाही- आमदार भीमराव केराम ​

३६ कोरोना पॉझिटिव्हची प्रकृती गंभीर

गुरुवारी प्राप्त झालेल्या स्वॅब अहवालात नांदेड महापालिका क्षेत्रात- ३५, नांदेड ग्रामीण- तीन, बिलोली नऊ, मुखेड-चार, लोहा-तीन, अर्धापूर-सहा, नायगाव-दोन, धर्माबाद- चार, मुदखेड-दोन, हदगाव- तीन असे ७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ हजार २७ इतकी झाली आहे. मात्र, आतापर्यंत १७ हजार ७१७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ६६९ ॲक्टिव रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत ४८७ स्वॅब अहवालांची तपासणी सुरु होती. 

कोरोना मीटर 

आज पॉझिटिव्ह रुग्ण- ७१ 
आज कोरोनामुक्त रुग्ण- १०१ 
आज मृत्यू- शुन्य 
एकुण पॉझिटिव्ह रुग्ण- १९ हजार २७ 
एकुण कोरोनामुक्त रुग्ण- १७ हजार ७१७ 
एकुण मृत्यू- ५०४ 
उपचार सुरु- ६६९ 
गंभीर रुग्ण- ३६ 
स्वॅब अहवाल बाकी- ४८७