...तरच तुम्हाला ही जिंकता येईल जग कसे चे वाचा

शिवचरण वावळे
Monday, 8 June 2020

कोरोनांतरच्या बदलेल्या जगाने आॅनलाईन प्लॅटफार्मला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. आॅनलाईनच्या या नव्या जगात वावरताना अनेक नव्या गोष्टी शिकण्यासोबतच समजुन घ्याव्या लागतील. त्यासाठी थोडा त्रासही सोसावा लागेल. परंतु त्यानंतर मात्र तुम्ही एक नवी दृष्टी घेऊन जगाकडे बघाल यात शंका नाही. 

नांदेड : लॉकडाउनमुळे शाळा-महाविद्यालये अडीच महिण्यापासून बंदच आहेत. परिक्षा होणार किंवा नाही. याचे चित्र अजुन तरी स्पस्ट नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी घाबरुन न जाता नव्या उत्साहाने गगन भरारी घ्यावी. नव्या जगात तुमच्याकडे तिसरा डोळा असेल तरच, तुम्हाला जग सहजपणे जिंकता येईल. पण हा तिसरा डोळा कॅमेरा नव्हे तर, दोन डोळ्यांनी दिसणाऱ्या नजरेपलिकडे पाहु शकणारी कल्पनाशक्ती आहे, असे ज्येष्ठ चित्रकार नयन बारहाते यांनी सांगितले.     

चित्रकाराला दोन डोळे बघण्यासाठी आणि तीसरा डोळा कल्पना करण्यासाठी असावा लागतो. कल्पनाशक्तीच्या पलिकडे पाहण्याचा तीसरा डोळा माझ्याकडे आहे. याची जाणीव झाली तेव्हा वर्तमानपत्रातील नौकरी सोडुन मुखपृष्ठ चित्रकार हा पेशा स्वीकारला. आपल्याकडे असलेली कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकतो याची जाणीव झाली. तेव्हापासूनच मुखपृष्ठ चित्रकार म्हणून प्रवास सुरु झाला; तो आजही सुरुच आहे. माझ्यातील कल्पनाशक्तीने मला कधीच मागे वळुन बघण्याची संधी दिली नाही. ‘पुस्तकाच्या चित्राची परीभाषा’ या विषयावर रविवारी (ता.सात जून) ते ‘सकाळ’ यीन बझ लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. 

हेही वाचा- ह्रदयद्रावक ; आई, डोळे उघडून बघ ना, कंठ दाटून चिमुकल्यांनी फोडला टाहो...

प्राख्यात कवी - लेखक गुलजार यांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ सजावटीची संधी

माझ्याकडे काही नसले तरी, केवळ कल्पना शक्तीचा तिसरा डोळा होता, म्हणून मी इथपर्यंत आलो. वेगळी ओळख निर्माण केली. मला वाणी, मौज, पॉपुलर या देशातील पुस्तक प्रकाशनाच्या काही निवडक पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करण्याची संधी मिळाली. तशी विदेशातील केब्रिंज सारख्या नामवंत विविध प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ बनवण्याचीही संधी मिळाली. शिवाय माजी परराष्ट्रमंत्री शशी थरुर, पाकिस्तांनी कवीचे 'हमे बहूत सारे फुल चाहिऐ' लेखक यशवंत मनोहर, श्रीपाद भालचंद्र जोशी, गुलजार यांच्या सारख्या प्राख्यात लेखक, कवी यांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ सजावटीचे काम करण्याची संधी मिळाली.

या पुस्तकांच्या मुखपृष्ठ कलाकृतीने  जो आनंद आणि अनुभव मिळाला तो कुठल्याही धन संपत्तीत न मोजता येण्याजोगा आहे. ज्या अनुभवाच्या जोरावर मागील ३५ वर्षापासून मुखपृष्ठ सजावटीचे अविरत काम सुरु आहे. तुमच्याकडे कल्पनाशक्ती असेल तर, तुम्ही सुद्धा जग जिंकू शकता असा कानमंत्रही नयन बारहाते यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

हेही वाचा- Video- धक्कादायक : खासगी रुग्णालयातून गर्भवतीला काढले बाहेर
मुखपृष्ठ वाचकांच्या मनावर गाजवते अधिराज्य 
मुखपृष्ठ बनवण्यापुर्वी पुस्तकाचा पोत समजून घ्यावा लागतो. कथा, कादंबरी, कविता, प्रवासवर्णन, आत्मचरित्र लेखन समजून घेण्यासाठी संपुर्ण पुस्तक वाचावं लगतं. पुस्तक समजून घ्यावं लागतं. त्यानंतर मनातील मुखपृष्ठाला नेमका आकार येतो. मुखपृष्ठामध्ये कल्पना शक्तीची जोड द्यावी लागते. तेव्हा कुठे पुस्तक वाचकांच्या मनावर प्रभाव टाकतो. असे पुस्तकच नव्हे तर मुखपृष्ठ देखील वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात खरे उतरते. 

असे बनवा अकर्षक मुखप्रष्ठ 
लेखक, प्रकाशन आणि मुखपृष्ठकार ह्या तीन व्यक्ती मुखपृष्ठ तयार करतांना महत्वाच्या असतात. पुस्तक म्हणजे लेखकाचं लेकरु तर  प्रकाशकाचं पोट आहे. लेखक आणि प्रकाशकांना जस मुखपृष्ठ पाहिजे तसे मुखपृष्ठ तयार केल्यानंतर मुखपृष्ठात जिवंतपणा आणण्याचे काम कलाकराचे आहे. त्यामुळे लेखक, प्रकाशक आणि मुखपृष्ठकार यांचा समन्वय साधावा लागतो. त्यातुन एक आकर्षक मुखपृष्ठ तयार होतो.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only Then Can You Conquer This World Read How Nanded News