esakal | Video- उद्धवा, आता तरी उघड मंदिराचे दार; नांदेडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

महाराष्ट्र शासनाने अद्यापही राज्यातील मंदिर उघडण्यासाठीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष नांदेड शाखेच्या वतीने पंचमुखी हनुमान मंदिर वजिराबाद आणि सचखंड गुरुद्वारा समोर शनिवारी (ता.२९) घंटानाद आंदोलन केले.

Video- उद्धवा, आता तरी उघड मंदिराचे दार; नांदेडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  अनलाॅकमध्ये केंद्र शासनाने सर्व व्यवहारांसोबतच मंदिरे उघडण्यास परवानगी जूनमध्येच दिलेली आहे. काही राज्यांनी त्याची अमलबजावणी केली. मात्र, महाराष्ट्र शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष नांदेड शाखेच्या वतीने पंचमुखी हनुमान मंदिर वजिराबाद आणि सचखंड गुरुद्वारा समोर शनिवारी (ता.२९) घंटानाद आंदोलन केले.

कोरोना महामारीने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. परिणामी, देश लॉकडाउन केला. त्यामध्ये संपूर्ण व्यवहार, रेल्वे, बससह सर्व मंदिरेही बंद ठेवण्यात आली होती. मात्र, जूनमध्ये केंद्रशासनाने काही अपवादन वगळता अनलॉकची घोषणा केली. त्यामध्ये सर्व व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिली. देशातील सर्व मंदिरेही उघडण्याचा सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाने या सूचनांची अमलबजावणी अद्यापही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे असंख्य भाविकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - जनावरांच्या गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करा- आमदार बालाजी कल्याणकर

पर्यटनावरही होतोय परिणाम
अनला’ॅकमध्ये महसूल मिळतो म्हणून दारुची दुकाने महाराष्ट्र सरकारने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, महाराष्ट्रातील बहुतांश मंदिरांतून शासनाला महसूल मिळत असताना मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही, याचे आश्‍चर्य वाटते. नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरची रेणुकामाता, नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा, विष्णुपुरी येथील शंकर जलाशयाच्या काठावर असलेले पुरातन काळेश्‍वर मंदिर असून, येथे वर्षभर भाविकांसोबतच पर्यटकांचीही मोठी गर्दी असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही देवस्थाने अद्यापही बंदच असल्याने, श्रावणातील निसर्गसौंदर्याचाही आनंद पर्यंटकांना किंबहुना नागरिकांना घेता येत नाही. 

हे देखील वाचाच - नांदेडला गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरुन लागले वाहू

सर्वच स्तरातून होतेय मागणी
इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व मंदिरे भाविकांसाठी उघडण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी आता सर्वचस्तरातून होताना दिसत आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्ष नादेड शाखेच्या वतीने  हनुमान पेठ(वजीराबाद) येथील हनुमान मंदिर समोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी महानगराध्यक्ष प्रवीण साले, ॲड. दिलीप ठाकूर, अनिलसिंह हजारी, राजू केंद्रे, श्रीराज चक्रावर, राज यादव, बबलू यादव, दिलीप कलवानी, ओम बंडेवार, पवन यादव आदी यावेळी उपस्थित होते. 

येथे क्लिक केलेच पाहिजे - Video - कोरोना इफेक्ट : नांदेड जिल्ह्यातील बॅट विक्रेत्यांची वाढली चिंता

सर्व धर्मिय समितीचेही निवेदन
केंद्र सरकारने जून महिन्यातच धार्मिक स्थळांना लॉकडाउनमधून वगळण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तरीही राज्य सरकारने अद्यापपर्यंत धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिलेली नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यासाठी सर्व धार्मिक स्थळे सुरू करावीत, अशी मागणी सर्वधर्मीय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी केली आहे. निवेदनावर कृष्णगुरू बेरळीकर, सोमेशगुरू दांडेगावकर, महेंद्रसिंघ पैदल, सतपालसिंघ लागरी, मुफ्ती खालेद शाकेर साहब, मौलाना अजीम रिजवी, भंते पय्याबोधी, टी. एम. जॉर्ज, सुहास पुजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

loading image