Nanded Weather Alert : आज ‘ऑरेंज अलर्ट’, तीन दिवस येलो अलर्ट; नांदेड जिल्ह्यात ताशी ५० कि.मी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता
Orange Alert : मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ मे रोजी नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नांदेड : मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या हवामान अंदाजानुसार शनिवारी (ता.२४) नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, २३, २५ आणि २७ मे रोजी येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.