टोमॅटो उत्पादनातून नोकरीवर मात, चार महिण्यात अडीच लाखाचे उत्पन्न

प्रल्हाद कांबळे
Thursday, 1 October 2020

हातची नोकरी गेल्याने मनस्ताप करत न बसता हदगाव तालुक्यातील एकाने आपल्या शेतात घाम गाळत चार महिण्यात तब्बल टोमॅटोच्या पिकाने अडीच लाखाचे उत्पन्न मिळवून दिले.

नांदेड : कोरोनाचा बहाणा करीत अनेक कंपन्या व व्यवस्थापनानी आपल्याकडील कर्मचारी कपात केली. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. कुशल कामगार अकुशल झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र हातची नोकरी गेल्याने मनस्ताप करत न बसता हदगाव तालुक्यातील एकाने आपल्या शेतात घाम गाळत चार महिण्यात तब्बल टोमॅटोच्या पिकाने अडीच लाखाचे उत्पन्न मिळवून दिले. शेतीशी नाळ असलेल्या या तरुणाने नोकरीचा नाद सोडून आता पूर्ण वेळ आधूनिक शेती करण्याच्या तयारीला लागला आहे. 

नोकरी गेलेल्या एका तरुणाने जिद्दीने शेतात राबून चार महिन्यात तब्बल अडीच लाख रुपयांचे उत्पन्न कमावले. त्यामुळे या तरुणाच्या धडपडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हदगाव तालुक्यातील कोळी येथील ज्ञानेश्वर पांडुरंग चंद्रवंशी (सुकळकर) या तरुणाला मुंबईत एका कंपनीमध्ये नोकरी लागली होती. त्यांनी नोकरी केली परंतु कोरोनाचे निमित्त करून कंपनीने त्याला नोकरीवरून कमी केले. त्यामुळे तो गावी परतला. इकडे आल्यावरही लॉकडाऊन होता. त्यामुळे करायचे काय? नुसते बसून जमणार नाही, हेच हेरून त्यांनी आपल्या शेतात राबणे सुरू केले, शेतातील १८ गुंठे शेती त्याने टोमॅटोसाठी घेतली. एका चांगल्या कंपनीचे टोमॅटो पिकाची लागवड केली. आणि त्यातून चार महिन्यात सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न कमावले.

हेही वाचाआगामी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा- डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शक सूचना

शेतकरऱ्यांनी पारंपारिक पिकावर अवलंबून राहू नये

दोन महिने त्याने आपल्या शेतात घाम गाळला. बोरचे पाणी दिले. आणि त्यानंतर टोमॅटो विकले. फक्त १८ गुंठे जमिनीवरील टोमॅटो लागवडीसाठी त्याला जवळपास ५० हजार रुपये खर्च आला. मात्र आलेल्या पिकातून निव्वळ नफा दोन लाख रुपये झाला. त्यामुळे मी नोकरी गेल्याचे दुःख विसरून गेलो असे ज्ञानेश्वर यांनी सांगितले. कुठलेही काम जीद्दीच्या तयारी जोरावर केले तर नक्कीच माणूस यशस्वी होतो. याचे ज्वलंत उदाहरण ज्ञानेश्वरचे आहे. यापुढील काळातही त्याने शेतामध्ये शेवगा लागवड केली आहे. आगामी काळात मला नोकरीवर कंपनीने घेतले नाही तर माझ्या शेताने मला जगण्याची नवी प्रेरणा दिली. शेतकरऱ्यांनी पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता आपल्या शेतात कोथिंबीर उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcome a job from tomato production, earning Rs 2.5 lakh in four months nanded news