esakal | नांदेडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन टॅंक दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय जिल्हा रुग्णालयात १३ हजार किलो लिटर क्षमतेचा आॅक्सिजन टॅंक शनिवारी दाखल झाला असून, ३१ आॅगस्टपर्यंत हा टॅंक कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

नांदेडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन टॅंक दाखल

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यासोबतच रुग्ण बरो होण्याचेही प्रमाण समाधानकारक आहे. असे असले तरी, रविवारी सायंकाळपर्यंत १९३ रुग्णांची प्रकृती ही गंभीर असून, त्यांना आॅक्सिजनची गरज आहे. 
 
जिल्ह्यात आजघडीला एक हजार ५१८ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. यातील १९३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यातील काही रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार आहेत. गंभीर रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज ८० आॅक्सिजन सिलेंडरची गरज भासत आहे. ही संख्या अपुरी असल्याने  या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन टॅंक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार स्वातंत्र्यदिनी हा टॅंक जिल्हा रुग्णालयात दाखल झाला असून, टॅंक बसविण्याचे काम सुरु झाले आहे.

हेही वाचाच - नांदेड : भरधाव स्कार्पिओच्या धडकेत आजी- नातू ठार -

टॅंक बसवायला लागणार ६३ लाख रुपये
३१ आॅगस्टपर्यंत हा आॅक्सिजन टॅंक कार्यान्वित होणार आहे. या आॅक्सिजन टॅंकपासून रुग्णालयात पाईपलाईनद्वारे जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे वारंवार सिलिंडरची बदलण्याचे काम राहणार नाही. तसेच रुग्णांनाही वेळेवर आणि मुबलक प्रमाणात आॅक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. एकवेळेस हा टॅंक भरल्यानंतर जवळपास दीडशे रुग्णांना पंधरा दिवस या टॅंकमधून आॅक्सिजन पुरवठा करता येणार आहे. यातून रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. हा टॅंक बसविण्यासाठी सुमारे ६३ लाख रुपये खर्च लागणार आहे.

हे देखील वाचा - विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करा- खासदार हेमंत पाटील

१३ हजार लिटर क्षमतेचा आहे टॅंक
शहरातील शासकीय रुग्णालयाचे विष्णुपुरी येथे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालयात रुग्णांना अत्यावश्‍यक असणाऱ्या सेवा पुरविण्यासाठी या रुग्णालयात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सध्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. तसेच डायबेटीज, दमा यासारख्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढत असून अशा रुग्णांना आॅक्सिजन पुरविणे अत्यावश्‍यक असते. त्या अनुषंगाने या रुग्णालयात १३ हजार लीटर क्षमतेचे आॅक्सिजन टॅंक शनिवारी दाखल झाला आहे.

येथे क्लिक केलेच पाहिजे - शोषितांसाठी झटणाऱ्या सुनिल ईरावारने जीवनयात्रा संपवली, काय आहे कारण? वाचा

१९३ रुग्णांची प्रकृती गंभीर
नांदेड जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळपर्यंत दोन हजार ४१४ इतकी कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. यापैकी रविवारपर्यंत दोन हजार ४१४ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. तर १४७ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. रुग्णालयामध्ये एक हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यापैकी १९३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.