esakal | पालकांनो सावधान :  नांदेड शहरातही आता कॉफी सेंटरही डबल डेक्कर, पोलिसांचे आहे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड ग्रामीण पोलिसांनी कौठा भागातील अशा सेंटरवर छापा टाकून सहा जोडप्यांना ताब्यात घेतले. त्यांना ग्रामीण पोलिस स्थानकात समज देऊन सोडण्यात आले. दरम्यान कौठा परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नागरिक अस्वस्थ असताना तेथे बिनदिक्कतपणे चालणारे कॉफी सेंटर बंद करावे अशी मागणी नागरिकांतून नेहमी होत राहिली आहे.

पालकांनो सावधान :  नांदेड शहरातही आता कॉफी सेंटरही डबल डेक्कर, पोलिसांचे आहे लक्ष

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनानंतर शहराच्या सर्वच भागात उघडले बेकायदेशीररित्या चालणारे कॉफी सेंटर. विशेष म्हणजे या सेंटरमध्ये प्रेमी जोडप्यांना सुरक्षीत जागा करुन देण्यात असून आता अनेक सेंटरमध्ये तर डबल डेकरची आसन व्यवस्था करुन देण्यात येत आहे. हा धक्कादायक प्रकार नांदेड ग्रामिण पोलिसांच्या कारवाईत पुढे आली आहे.  

नांदेड ग्रामीण पोलिसांनी कौठा भागातील अशआ सेंटरवर छापा टाकून सहा जोडप्यांना ताब्यात घेतले. त्यांना ग्रामीण पोलिस स्थानकात समज देऊन सोडण्यात आले. दरम्यान कौठा परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नागरिक अस्वस्थ असताना तेथे बिनदिक्कतपणे चालणारे कॉफी सेंटर बंद करावे अशी मागणी नागरिकांतून नेहमी होत राहिली आहे. तरीदेखील कायद्याला न जुमानता सुरु असलेले कॉफी सेंटर पाहून नागरिकातून रोष व्यक्त होत होता.

अखेर नागरिकांच्या धोशामुळे पोलिसांना ही कारवाई करावी लागली. गंभीर बाब म्हणजे कॉफी सेंटरमध्ये मुला- मुलींना बसण्यासाठी ट्रॅव्हल्स बसमध्ये वर खाली असते त्याप्रमाणे तेथेही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मामा चौक दरम्यान एका मोठ्या सेंटरमध्ये युवक- युवती असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी  कारवाई केली. त्याच ठिकाणी वरच्या डेकरमध्ये आणखी व्यवस्था केल्याचे आढळून आल्याने पोलिसही चक्रावून गेले. 

हेही वाचा नांदेड : देहदानातून जीवनदान देण्याचा पाच ज्येष्ठ महिलांचा संकल्प -

पोलिसांना बाहेरुन दरवाजा कुलूप बंद असून आतामध्ये प्रेमी युगुलांचे गोरखधंदे सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरवातीला पोलिसांनी त्या कुलुपबंद खोलीकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर दरवाजावर लाथा घातल्यानंतर आणखी तीन जणांना ताब्यात घेतले. याचदरम्यान आणखी एक जोडपे कॉफी सेंटरमध्ये बसण्यासाठी आले असता त्यांचाही नंबर लागला होता. त्या पाठोपाठ आणखी एक युवक मैत्रिणीला घेऊन आला मात्र काहीतरी घोटाळा असल्याचे दिसून येतात त्यांनी तिथून पळ काढला.

कॉलेज सुरु होऊन आठवडा झाला नाही तोच युवक- युवतींनी कॉपी सेंटरचा रस्ता पकडल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. शहराच्या अनेक भागात चालणाऱ्या कॉफी सेंटर हे नागरिकांसह महिलांचा प्रखर विरोध असतानाही हे कॉफी सेंटर एवढ्या हिमतीने चालतात कसे असा प्रश्न विचारला जात असला तरी शहरातील कॉपी सेंटर कायमचे बंद करावेत अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. 

loading image
go to top