
भोकर, (जि. नांदेड) ः तब्बल महिन्याभरापासून जगभरात लाॅकडाऊन असल्याने कामांच्या शोधात पर राज्यात गेलेली गावाकडील मंडळी अडकून पडली आहे. जिल्ह्यातील सिमाबंदी केल्याने गावाकडे येणे कठीण झाले आहे. भोकर शहरालगतच तेलंगणा सिमा हाकेच्या अंतरावर आहे. तपासणी नाका चूकवून सिमेवर असलेल्या गावात घुसखोरांनी रात्रीला पाऊलवाट धरून प्रेवेश करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अशा घुसखोरांची माहिती घेणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनावर अद्याप लस निघाली नसल्याने या पासून सूटका करण्यासाठी लाॅकडाऊन हाच एकमेव उपाय आहे. याची खात्री झाल्याने भारतात संचारबंदी लागू करण्यात आली. परिणामी सगळे व्यवहार ठप्प झाली आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील सिमाबंदी करण्यात आली. प्रारंभी पंधरा दिवसांचे होते पण आजार बळावत गेल्याने पुन्हा लाॅकडाऊन वाढविण्यात आले. त्यामुळे परराज्यात अडकून पडलेल्यांची चिंता वाढली. आप आपले गाव गाठण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला. जिल्हा आणि सिमाबंदी केल्याने गावाकडे जाण्याच्या मार्गात मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून परराज्यातील कामगार. माहेरवाशीण पाहुणे मंडळींनी मुख्य रस्त्यावर असलेल्या तपासणी नाक्याला चूकवून चक्क पाऊलवाट तर काहिनी शेताचा आडमार्गाने आपले गाव गाठले आहेत. अशा घूसखोरी केलेल्या ईसमाकडून कोरोना सारख्या विषाणुचा शिरकाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबधीतानी त्वरीत लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सिमेवरील गावात सर्वे गरजेचे
शासनाने कोरोनाच्या जीवघेण्या विषाणुला लगाम लावण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीने आपली माहिती लपवून ठेवल्याने शासनही चक्राऊन गेले आहे. भोकर तालुका हा तेलंगणा सिमेवर असून सिमेवर असलेल्या गावातील बहुतांश ग्रामस्थ तेलंगणात नेहमी ये-जा करतात. पाहूने मंडळीही बरीचशी आहे. महाराष्ट्रातील लेकीबाळी तेलंगणात दिल्या आहेत. कामाच्या शोधात कामगार स्थलांतरित झाले आहेत. भोकर बाजार पेठेत मालाची आवक सुरू झाली आहे. यात बहुतांशी शेतकरी हे तेलंगणातून येतात. लगतच्या तेलंगणात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याचे लोण महाराष्ट्रातील सिमेवर असलेल्या गावात घुसखोरांकडून होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा अशा लोकांची तपासणी करून वेळीच काळजी घेतली तर मोठा अनर्थ टळु शकतो. सिमाबंदी केली हि बाब कौतुकास्पद आहे. त्याच बरोबर घुसखोरी केलेल्यांचे सर्व्ह करणे काळाची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.