esakal | नायगाव : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध- चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महिलेच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

नायगाव : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध- चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : लग्नाचे अमिष दाखवत मागच्या आठ वर्षापासून शारिरीक संबंध ठेवले. संमतीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या देवून चार वेळा गर्भपात केला व ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. 

शहरातील मटका चालक असलेला अब्दुल मतीन सलीमसाब याने गावातीलच एक मुलीसोबत सुत जुळवले व तीला लग्नाचे अमिष दाखवून सन २०१२ पासून ते ०७ जुलै २०२० पर्यंत वारंवार जबरदस्तीने शारिरीक संबध ठेवले. फिर्यादीचे घरी,टेरेसवर व नरसी येथे नेवून शारीरिक संबंध ठेवले. त्याचबरोबर संमतीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या देवून चार वेळा गर्भपातही केला. या दरम्यान सदरच्या मुलीने लग्नाचा तगादा लावल्याने वेळोवेळी वेगवेगळी कारणे दाखवून लग्न करण्यास टाळाटाळ केली. 

हेही वाचा - नांदेड : शासनाला दरमहा ४० कोटी महसुल देणारी कंपनी बंद...कशामुळे ते वाचा?

अब्दुल मतीन यास पोलिसांनी अटक केली

लग्नाचे अमिष दाखवून मागच्या आठ वर्षापासून शारीरिक संबध तर ठेवलेच पण लग्नासाठी तगादा लावल्यानंतर मात्र अब्दुल मतीने याने जिवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकाराला त्याचे वडील अब्दुल सलीम अ. करीम, आई मौलनबी अ.सलीम आणि भाऊ अब्दुल नदीम यानेही मदतच केली. लग्नासाठी अनेकवेळा विनंती केल्यानंतरही लग्न करण्यास नकार दिल्यानंतर अखेर सदरच्या मुलीने ता. २९ रोजी नायगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन वरील चौघांच्या विरोधात कलम ३१३, ३७६ (२) ( एन) व ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल मतीन यास पोलिसांनी अटक केली आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामा पडवळ हे करत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे