Video - गोवर्धनघाट टेकडीत कोसळला पिंपळवृक्ष

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड : शहरातील पोलिस अधिक्षक निवासस्थानामधील महाकाय पिंपळवृक्ष गुरुवारी (ता.११ जून) रात्री गोवर्धनघाट टेकडी येथील लोकवस्तीत कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवीतहानी झाली नसली तरी चार कुटुंबाचा संसार उध्वस्त झाला आहे. पोलिस अधिक्षक निवासस्थानास लागून पूर्व बाजूने गोवर्धनघाट टेकडी येथे दाट लोकवस्ती आहे. 

गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू असताना अचानक पिंपळवृक्ष बाजूच्या लोकवस्तीत कोसळला. अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरीक घटनास्थळाकडे धावले. पण रात्रीची वेळ असल्याने धावत सुटलेल्या नागरिकांच्या बराच वेळ नेमका प्रकार लक्षात आला नाही. झाडाखाली दबलेल्या चार पाच घरातून अचानक ओरडण्याचा आवाज आल्यामुळे नेमका प्रकार इतर नागरिकांच्या लक्षात आला. पाऊस सुरू असल्यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी तत्काळ महावितरण कंपनीच्या कार्यालयास संपर्क साधून वीजपुरवठा खंडीत करण्याची मागणी केली

हे ही वाचानांदेडात आजही कोरोनाने घेतला दोघांचा बळी, एक पॉझिटिव्ह
 
दरम्यान, पिंपळाचे झाड लोकवस्तीतील लिंबाच्या झाडावर कोसळल्यामुळे लिंबाच्या झाडाचा अर्धा हिस्याखाली मंजुळाबाई सटवाजी घोंगडे, राम खंडू कांबळे यांची तर पिंपळाच्या झाडाखाली संगीताबाई माधव घोंगडे, मारोती आबाजी गाडे, आनंद परभता गाडे यांच्यासह एकूण पाच घरे दबली गेली. संकटग्रस्त घरातील नागरिकांनी आरडा-ओरड करून मदतीची याचना केली असता जमलेल्या नागरिकांनी तातडीने वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर रात्री साडेआठच्या दरम्यान घरातील बालक, ज्येष्ठ नागरीकांसह पुरुष, महिला मंडळींना सुखरुप बाहेर काढले. दक्ष नागरीकांच्या तत्परतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी घराच्या छतावरील पत्रे, भिंती भुईसपाट झाल्या तर संसारोपयोगी साहित्यांचा चुराडा झाला. 

घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिसांनी घटनास्थळ गाठून दुर्घटनाग्रस्त नागरिकांची चौकशी केली. जीव वाचून कसेबसे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मुलाबाळांसह रात्र रस्त्यावरच जागून काढावी लागली. शुक्रवारी (ता. १२) दुपारपर्यंत लोकप्रतिनिधींसह महापालिका, महसूल प्रशासनाचे अधिकारी फिरकले नाहीत. एवढ्या मोठ्या दुर्घटनेत जीव वाचल्याच्या भावना व्यक्त करणारे नागरीक पै-पै करुन जमवलेला संसार उध्वस्त झाल्याचा कंठ दाटून फोडत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख यांनी घटनास्ळावर धाव घेवून नागरिकांचे सांत्वन केले. 

दुर्घटनेमध्ये झालेले नुकसान व घरावर छत मिळावे एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करत आमच्यासह लहान मुलाबाळांना परिसरातील नागरीकांनी झाड्याच्या फांद्या तोडून सुखरुप बाहेर काढले. कोरोना संकटामुळे इतर कोणाच्या घरी जाण्यापेक्षा रस्त्यावर बसून रात्र काढली. लोकप्रतिनिधीसह जबाबदार प्रशासनाचा अधिकारी, कर्मचारी आमच्याकडे फिरकला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. पोलिस अधिक्षक निवासस्थानामधून जेसीबी, क्रेनच्या साह्याने कोसळलेल्या पिंपळाचा व लिंबाचा भाग शुक्रवारी हटविण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com