हरीत नांदेड अभियानांतर्गत महात्मा गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त वृक्षारोपण

प्रल्हाद कांबळे
Monday, 5 October 2020

या अभियानांतर्गत आत्तापर्यंत शहरात पाच ठिकाणी घनवन वृक्षलागवडही करण्यात आलेली असून 7500 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड आत्तापर्यंत झालेली आहे.

नांदेड : शहरात नांदेड वाघाळा शहर मनपा व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून वृक्षलागवड हरीत नांदेड अभियान राबविण्यात येत आहे, या अंतर्गत शहरातील विविध कॉलनी, मोकळ्या जागा, मुख्य रस्ते, विविध उद्यानात जिथे संगोपनाची हमी असेल तिथे निःस्वार्थ भावनेतून वृक्षलागवड वृक्षमित्र स्वतः खड्डे करून करीत आहेत. या अभियानांतर्गत आत्तापर्यंत शहरात पाच ठिकाणी घनवन वृक्षलागवडही करण्यात आलेली असून 7500 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड आत्तापर्यंत झालेली आहे.

हरीत नांदेड अभियान अंतर्गत मनपा, वृक्षमित्र फाऊंडेशन व लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (ता. चार) ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जुना मोंढा टॉवर येथील उद्यानात नवनिर्वाचित महापौर मोहिनी येवनकर यांच्या हस्ते वृक्षलागवड करून आजच्या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

हेही वाचानांदेड- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे तिनतेरा, तरीही श्रेयवादाचे राजकारण संपेना

पर्यावरण संवर्धनात अग्रेसर

याप्रसंगी महापौरांनी शहर हरीत करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करून मनपा प्रशासन या लोकचळवळीस मोठ्या प्रमाणात यशस्वी करेल व पर्यावरण संवर्धनात अग्रेसर राहील, असा विश्वास दिला. आजच्या वृक्षलागवड कार्यक्रमात 31 मोठ्या निसर्गपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात मनपा नगरसेविका श्रीमती खालसा मॅडम, श्री खालसा, नगरसेवक सुरेश हटकर, श्री सोढी, उद्यान निरीक्षक उल्हास महाबळे तसेच वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, प्रीतम भराडीया, प्रल्हाद घोरबांड, सचिन जोड, डॉ. तुळशीराम चिमणे, प्रताप खरात, लक्ष्मण गज्जेवार, प्रदीप मोरलवार, अनुपाल ठाकूर, प्रशांत रत्नपारखी, लक्ष्मीकांत कोल्हेकर, चंद्रकांत मुलंगे, चैतन्य पिंपळ डोहकर, सर्व वृक्षमित्रांनी वृक्षलागवड केली.

यांची होती उपस्थिती

तसेच लायन्स क्लब नांदेड मिडटाऊन तर्फे पर्यावरण सप्ताहअंतर्गत लायन्सचे पदाधिकारी अध्यक्ष लॉ. जुगलकीशोर अग्रवाल, सचिव लॉ. मनीष माकन, कोषाध्यक्ष लॉ. शिरीष गीते व लॉ. प्रवीण अग्रवाल, विजय घई, योगेश जैस्वाल, सुनील देशपांडे, सतीश सामते, अशोक कासलीवाल, सुबोध जैन या सर्वांनी वृक्षलागवड केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plantation on the occasion of Mahatma Gandhi and Shastri Jayanti under Harit Nanded Abhiyan nanded news