esakal | प्लाझ्मा थेरपी अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी वरदान, कशी? ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

सध्या देशात व त्यातही महाराष्ट्र राज्यात कोरोना आजाराचा कहर दिवसागणिक वाढतच आहे. त्यातूनही कोरोना आजारावर कुठलेही खात्रीशीर औषध अथवा लस उपलब्ध नसल्यामुळे जनसामान्यांसह केंद्र व राज्य शासन सुध्दा हतबल होतांना दिसत आहे.

प्लाझ्मा थेरपी अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी वरदान, कशी? ते वाचाच

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  सद्यपरिस्थितीत मास्क, सामाजिक अंतर, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा व होमिओपॅथीक औषधी घेणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपल्याला कोरोना आजारपसून दूर राहता येईल. कोरोनाच्या  निराशाजनक वातावरणातसुद्धा प्लाझ्मा थेरपी ही सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासादायक उपचारपद्धती असल्याचे मत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. गंगाधर घुटे यांनी सांगितले.

प्लाझ्मा हा आपल्या रक्तातील द्रव पदार्थ असून मानवी रक्तामधे साधारणतः ५५ टक्के प्लाझ्मा व उर्वरित ४५ टक्के लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्तपेशी, रक्तकनिका यांचा समावेश होतो. आपल्या प्लाझ्मामध्ये पाणी, ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, खनिजद्रव्य, संप्रेरके, अँटिबॉडीज आदी घटकद्रव्य असतात. प्लाझ्मामधील अँटिबॉडीज या एकप्रकारचे प्रथिन आहे.  जिवाणू किंवा विषाणूंचा आपल्या शरीरावर जेंव्हा हल्ला होतो तेंव्हा त्या जिवाणू किंवा विषाणूंचा सामना करून त्यांना नष्ट करण्यासाठी आपले शरीर अँटिबॉडीज तयार करत असते. 

हेही वाचा - धक्कादायक! भाजप खासदाराला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

रुग्ण का होतो अत्यवस्थ?
सर्वसामान्यपणे चांगली रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व सकस आहार घेणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात जिवाणू किंवा विषाणू संक्रमणानंतर या अँटिबॉडीज मोठ्या प्रमाणात तयार होतात. परंतु रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब, ह्रदयरोग, दमा, कर्करोग यासारखे आजार असलेल्या रूग्णांच्या शरीरात कोरोना विषाणूंचा शिरकाव झाल्यास त्याला निष्क्रिय करण्यासाठी अशा प्रकारच्या अँटिबॉडीज मोठया प्रमाणात तयार होत नाहीत आणि त्यामुळेच शरीरात विषाणूंची संख्या वाढून रुग्ण अत्यवस्थ होतात. 

हेही वाचाच - Video - नांदेडमध्ये सोमवारी रात्री पावसाची जोरदार बॅटींग, बहुतांश रस्ते झाले होते जलमय

प्लाझ्मामुळे कोरोनावर मात सहज शक्य
ज्या रुग्णांना कोरोना आजार झालेला आहे व उपचारास ज्यांचे शरीर साथ देत नाही अशा रुग्णांना त्यांच्याच रक्तगटाच्या (Blood group compatibility नुसार) कोरोना आजारावर मात केलेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा दिल्यास रुग्ण कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकतात. कारण या रुग्णांना कोरोनावर मात करण्यासाठी तयार अँटिबॉडीज मिळतात. साधारणतः मध्यम स्वरूपाचा आजार असलेल्या रुग्णास वेळेवर प्लाझ्मा मिळाल्यास तो यशस्वीपणे कोरोनावर मात करू शकतो.

येथे क्लिक कराच - नांदेड जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरूपी समायोजन रखडले

सर्वप्रथम येथे झाली प्लाझ्मा थेरपी
जगाच्या इतिहासात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग सर्वप्रथम जर्मन फिजिओलॉजिस्ट एमिल व्होन बेह्रिग यांनी १८९० मध्ये डीपथेरिया आजारामध्ये केला होता.  त्यानंतरही स्पॅनिश फ्लू  १९१८, इबोला २००३, सार्स आणि मार्स २०१२ इत्यादी साथीच्या आजारात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करण्यात आला होता. आपल्या देशात कोरोना आजारासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता देणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर दिल्ली, महाराष्ट्र आणि ईतर राज्यात या थेरपिला मान्यता देण्यात आली.  सद्यस्थितीत दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीत अग्रेसर आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली जिल्ह्यात एका वर्षात दहा बालविवाह रोखण्यात यश

कोण करू शकतो प्लाझ्मा दान?
ज्यांचे वय १८ ते ६० वर्षे आहे, वजन ५० किलोपेक्षा जास्त, हिमोग्लोबिन १२.५ टक्के, कोरोना अँटिबॉडीजचे प्रमाण १.६० आहे अशा व्यक्ती कोरोना आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा दान करू शकतात. ज्या व्यक्तीला मधुमेह, ह्रदयरोग, रक्तदाब, कॅन्सर आदी आजार आहेत किंवा ज्यांचा मागील तीन महिन्यांत विदेश दौरा झालेला असेल किंवा ज्यांना ईतर कोणत्याही प्रकारचा आजार असेल व औषधी चालू आहेत अशा व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकत नाहीत.

हे तर वाचाच - परभणी कोविड रुग्णांसाठी अतिअद्यावत १०० खाजगी बेड उपलब्ध

प्लाझ्मा दान रक्तदानासारखीच सुरक्षित
प्लाझ्मा दान ही प्रक्रिया रक्तदाना सारखीच सुरक्षित आहे.  त्याचा दात्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. या प्रक्रियेसाठी साधारणतः एक तास वेळ लागतो व आवश्यक त्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्यानंतरच दात्यांचा प्लाझ्मा घेतला जातो.  एकावेळी ४०० एमएल प्लाझ्मा काढण्यात येतो. आपल्या एका प्लाझ्मा दानामुळे किमान दोन अत्यवस्थ कोरोना रुग्णाचे प्राण वाचविले जाऊ शकतात.  त्यामुळे कोरोनवर मात केलेल्या प्रत्येक व्यक्तीने प्लाझ्मा दान केलेच पाहिजे. 

अशी करावी प्लाझ्मा थेरपी
कोरोनवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर प्लाझ्मा थेरपी सुरू करू नये. मध्यम स्वरूपाचा आजार आहे तेंव्हाच प्लाझ्मा थेरपी सुरू करावी. जेणेकरून मृत्यूदर कमी होईल व प्रचंड प्रमाणात होणारी जीवित हानी टळेल. 
- डॉ. गंगाधर घुटे, नांदेड.