
किनवट : नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राज्यात राबवली जात आहे. विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएससी (सेतू सेवा केंद्र) धारकास केवळ रुपये ४० इतकेच अधिकृत शुल्क द्यावे. खरीप हंगामासाठी अधिसूचित केलेल्या पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी केले.