Nanded : ९१ हजार पात्र कुटुंबाची ई - केवायसी रखडलेलीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Kisan

Nanded : ९१ हजार पात्र कुटुंबाची ई - केवायसी रखडलेलीच

नांदेड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यात सध्या पाच लाख १८ हजार ६६७ शेतकरी वार्षिक सहा हजार रुपये निधीसाठी पात्र ठरले आहेत. या सन्मान निधीचे हप्ते सुरळीत चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलवर ई - केवायसी करण्याचे आवाहन केले होते. परंतु अद्याप जिल्ह्यात ९१ हजार १७६ शेतकरी कुटुंबाची ई - केवायसी रखडली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत जिल्ह्यातील पाच लाख १८ हजार ६६७ पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. लाभार्थी कुटुंबाची माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत सन्मान निधी अंतर्गत अकरा हप्त्यात दोन हजार रुपयानुसार प्रतिवर्ष सहा हजार रुपये एवढी रक्कम मिळाली आहे.

पुढील हप्ते नियमित चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी ई - केवायसी करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या सेतु सुविधा किंवा सीएससी केंद्रावर जावून काम करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. या कालावधीत ६० हजार कुंटुंबाने ई - केवायसीचे काम केले. परंतु अद्याप ९१ हजार १७५ शेतकऱ्यांनी ई - केवायसी केली नसल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली.

Web Title: Pm Kisan Samman Yojana Nanded 91 Thousand Eligible Farmer E Kyc Pending

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..