
नांदेड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ देशाचा आत्मविश्वास वाढविणारा आणि आपली क्षमता जागतिक पातळीवर सिद्ध करणारा ठरला, असे मत खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ‘संकल्प से सिद्धी तक’ या विषयावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.